Salman Khan Bullet Proof Car: सलमानने खरेदी केली बुलेटप्रुफ गाडी, भाईजानच्या सुरक्षेसाठी थेट भारतात आयात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 11:32 AM2023-04-07T11:32:40+5:302023-04-07T11:38:57+5:30

सलमान खानच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला.

Salmankhan buys bulletproof car Nissan patrol SUV directly imported to India for his security | Salman Khan Bullet Proof Car: सलमानने खरेदी केली बुलेटप्रुफ गाडी, भाईजानच्या सुरक्षेसाठी थेट भारतात आयात

Salman Khan Bullet Proof Car: सलमानने खरेदी केली बुलेटप्रुफ गाडी, भाईजानच्या सुरक्षेसाठी थेट भारतात आयात

googlenewsNext

बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खानला (Salman Khan) सतत जीवघेण्या धमक्या मिळत आहेत. काळवीट शिकारप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने (Lawrence Bishnoi) त्याला तुरुंगातूनच खुली धमकी दिली होती. यानंतर सलमानला ईमेलच्या माध्यमातून धमकीचे मेसेज आले. यामुळेच की काय आता सलमानच्या ताफ्यात थेट बुलेटप्रुफ गाडीचा समावेश करण्यात आला आहे.

सलमान खानने निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. अद्याप ही गाडी भारतीय बाजारात लॉंच झालेली नाही. सलमानच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. सलमानसाठी  Nissan Patrol SUV गाडी थेट आयात करण्यात आली. साऊथ एशिया बाजारातील महागड्या आणि लोकप्रिय गाड्यांमध्ये एक ही एसयूव्ही आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही गाडी खूपच खास आहे.

फ्लॉप सिनेमांवर सलमानची हटके स्टाईल फटकेबाजी, म्हणाला, 'आजकालचे काही दिग्दर्शक...'

18 मार्च रोजी सलमान खानला एक धमकीवजा ईमेल मिळाला. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईने धमकी दिल्यानंतर हा मेल आला होता. पोलिसांनी लॉरेन्स आणि गोल्डी ब्रार विरोधात तक्रार दाखल केली होती. 'गोल्डी ब्रारला तुझा बॉस म्हणजेच सलमानशी बोलायचे आहे. त्याने मुलाखत बघितलीच असेल. प्रकरण संपवायचं असेल तर बोलणं करुन दे.आमने सामने बोलायचं असेल तर तसं सांग. आता वेळीच समजावलं आहे नाहीतर नंतर झटकाच बघायला मिळेल.' असं त्या ईमेल मध्ये लिहिण्यात आलं होतं.

सध्या सलमान खान गँगस्टर्सच्या निशाण्यावर आहे. म्हणूनच त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या ताफ्यात बुलेटप्रुफ निसान गाडी सामील करण्यात आली आहे.

Web Title: Salmankhan buys bulletproof car Nissan patrol SUV directly imported to India for his security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.