सलमानने मानले चाहत्यांचे आभार
By Admin | Updated: January 18, 2017 13:51 IST2017-01-18T13:50:28+5:302017-01-18T13:51:30+5:30
अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात सलमान खानला सबळ पुराव्या अभावी जोधपूरमधील सत्र न्यायालयाने आरोपातून मुक्तता केली आहे.

सलमानने मानले चाहत्यांचे आभार
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात सलमान खानची सबळ पुराव्या अभावी जोधपूरमधील सत्र न्यायालयाने आरोपातून मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर ट्विटरवरून त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. सलामान खानने समर्थन करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
निकाल सुनावण्यात आला तेव्हा स्वत: सलमान त्याची बहीण अलविरासह न्यायालयात उपस्थित होता. तसेच न्यायालयाच्या आवारात सलमानच्या चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती.
Thank you for all the support and good wishes— Salman Khan (@BeingSalmanKhan) 18 January 2017