सलमान-सोनाक्षीत पॅचअप तर झाले नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 20:14 IST2016-12-25T20:09:27+5:302016-12-25T20:14:34+5:30

बॉलिवूडचा ‘भाई’ अशी ओळख असलेल्या सलमानबरोबर जो कोणी पंगा घतो, त्याला त्यातून सावरणे जवळपास अशक्य असते. असे बरेचसे उदाहरणे ...

Salman-Sonekshat patches are not there? | सलमान-सोनाक्षीत पॅचअप तर झाले नाही ना?

सलमान-सोनाक्षीत पॅचअप तर झाले नाही ना?

लिवूडचा ‘भाई’ अशी ओळख असलेल्या सलमानबरोबर जो कोणी पंगा घतो, त्याला त्यातून सावरणे जवळपास अशक्य असते. असे बरेचसे उदाहरणे आहेत की, ज्यांनी सलमानबरोबर पंगा घेतल्याने त्यांचे बॉलिवूड करिअर उद््ध्वस्त झाले आहे. असाच पंगा दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हिने सलमानबरोबर घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे तिचा ‘दबंग-३’मधून पत्ताही कट केल्याचे बोलले जात होते. मात्र ख्रिसमसनिमित्त चक्क सोनाक्षी सिन्हा बिग बॉसच्या घरात आल्याने सलमान आणि तिच्यात पॅचअप तर झाले नाही, अशी चर्चा आता रंगत आहे.

The Dabangg pair, @beingsalmankhan & @sonakshisinha re-unite on the stage of #BB10WeekendKaVaar with their amazing chemistry! Don't miss! pic.twitter.com/8zskAnfqDD— Bigg Boss (@BiggBoss) December 25, 2016}}}} ">http://

}}}} ">The Dabangg pair, @beingsalmankhan & @sonakshisinha re-unite on the stage of #BB10WeekendKaVaar with their amazing chemistry! Don't miss! pic.twitter.com/8zskAnfqDD— Bigg Boss (@BiggBoss) December 25, 2016
सलमानचा भाऊ अरबाज खान याच्या ‘डॉली की डोली’ या चित्रपटाला सोनाक्षी सिन्हाने नकार दिला होता. तसेच सलमाननेच तिचे बॉलिवूड करिअर घडविले या चर्चेवरून सोनाक्षी सतंप्त होत असल्याचे सलमानच्या कानावर पडले होते. त्यावरूनच सलमान आणि तिच्यात कोल्ड वॉर सुरू झाला. तसेच सलमानने दबंग सीरिजच्या तिसºया चित्रपटातून तिचा पत्ताही कट केल्याचे बोलले गेले. त्यातच सलमान ज्याच्याशी दुश्मनी करतो, त्याला सहजासहजी जवळ करीत नसल्याचा आतापर्यंतचा इतिहास असल्याने तो सोनाक्षीसोबत चित्रपट करणार की नाही याविषयी शंका होती. 

.@sonakshisinha & @ManishPaul03 makes housemates Christmas a merry one with their fun task! #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/YXjmCRhZCN— Bigg Boss (@BiggBoss) December 25, 2016}}}} ">http://

}}}} ">.@sonakshisinha & @ManishPaul03 makes housemates Christmas a merry one with their fun task! #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/YXjmCRhZCN— Bigg Boss (@BiggBoss) December 25, 2016
मात्र आता या दोघांमधील कोल्डवॉर काहीसा निवळला असताना दिसत आहे. ख्रिसमसनिमित्त सोनाक्षी सिन्हा आणि मनीष पॉल या दोघांनी बिग बॉसच्या घरात एंट्री करीत जबरदस्त धमाल केली. त्यापूर्वी सलमानसोबतही या दोघांनी धमाल करताना प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सोनाक्षी ज्या पद्धतीने शोमध्ये सलमानसोबत बोलत होती, त्यावरून दोघांमधील वाद आता काहीसा निवळल्याचे दिसून आले. 
सोनाक्षी सिन्हा आणि मनीष पॉल यांनी घरात एंट्री करून घरातील सदस्यांना गिफ्ट दिले. तसेच त्यांना टास्कही दिला.
सोनाक्षीला २०१० मध्ये ‘दबंग’ या चित्रपटातून सलमानने लॉँच केले होते. चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री जबरदस्त होती. या चित्रपटामुळेच सोनाक्षीला दबंग गर्ल अशी ओळखही मिळाली. 

Web Title: Salman-Sonekshat patches are not there?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.