सलमान -शाहरुखचे ‘पीर्इंग अफेअर’ जोरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 17:25 IST2016-11-24T16:16:37+5:302016-11-24T17:25:05+5:30

बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख आणि ‘दंबग खान’ सलमान हे आपसातील भांडणे विसरून पुन्हा एकदा चांगले मित्र झाले आहेत. दोघांमध्ये ...

Salman-Shahrukh's 'Praying Affair' loud! | सलमान -शाहरुखचे ‘पीर्इंग अफेअर’ जोरात!

सलमान -शाहरुखचे ‘पीर्इंग अफेअर’ जोरात!

ong>बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख आणि ‘दंबग खान’ सलमान हे आपसातील भांडणे विसरून पुन्हा एकदा चांगले मित्र झाले आहेत. दोघांमध्ये नेहमीच भेटीगाठी होत असतात. आधी या दोघांच्या कोल्ड वॉरच्या चर्चा रंगायच्या आताश: दोघांच्या मैत्रीचे किस्से गाजू झाले आहेत. त्यातच गेल्या विकएंडला सलमान व शाहरुख यांच्यात एका बॉलिवूड प्रोजेक्टवर चर्चा झाल्याची माहिती आहे. बॉलिवूडमध्ये या भेटीची चर्चा ‘पीर्इंग अफेअर’ या नावाने होत आहे.

गत आठवड्यात शाहरुख गॅलेक्सी अपार्टमेंट येथील  सलमानच्या घरी गेला होता.   दोघांमध्येही दुपारी बराच वेळ चर्चा रंगली. सूत्रांच्या मते, सलमान व शाहरुख यांनी आपली मैत्री आणखी पुढे नेत नव्या प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. कदाचित याच संदर्भांत सलमान व शाहरुख यांनी एकमेकांची भेट घेतली असावी. सलमानची क्रेझ आजही कमी झालेली नाही.नेमक्या याचाच काही उपयोग करता येईल का? याच शोधात शाहरुख असल्याचे जाणकारांचे मत आहे. 

या नव्या प्रोजेक्टसाठी दोघेही उत्सुक असून दोघांनी एक फोटोही काढला असल्याचे समजते. यात दोघेही एका ग्रीन लॉनवर एकत्र ‘सू-सू’ करताना दिसत आहेत. इंडस्ट्रीतील जाणकारांच्या मते, हा आनंदाचा क्षण मानता येईल. काही कारणांमुळे हा फोटो प्रसिद्ध करता येत नाही. पण सलमान व शाहरुख पार्टीपलिकडे जाऊन एकत्र येत असतील तर ते बॉलिवूडसाठी नक्कीच चांगले असेल. 
salman-khan-shahrukh-khan-peeing affair-in-bollywood


काही वर्षांपूर्वी आमिर खानने देखील सलमान खानसोबत ‘सू-सू’करतानाचा फोटो काढला होता. या फोटोवरूनच ‘पीर्इंग अफेअर’ हे नाव रूढ झाले होते. अर्थात ,या ‘पीर्इंग अफेअर’नंतरही काहीच झाले नव्हते. सलमान-शाहरुख नक्की नवे काही करतील अशी आशा ठेवूयात!

salman-khan-shahrukh-khan-peeing affair-in-bollywood- Salman-aamir peeing
 

Web Title: Salman-Shahrukh's 'Praying Affair' loud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.