‘रेस ३’ साठी सलमानचा नकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 18:50 IST2016-11-01T18:50:47+5:302016-11-01T18:50:47+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याला सध्या जरा जास्तच मागणी आहे. इतकी की,बॉलिवूडचा प्रत्येक निमार्ता सल्लूमियाँला स्वत:च्या चित्रपटात घेण्यासाठी ...

Salman rejects for 'Race 3' | ‘रेस ३’ साठी सलमानचा नकार?

‘रेस ३’ साठी सलमानचा नकार?

लिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याला सध्या जरा जास्तच मागणी आहे. इतकी की,बॉलिवूडचा प्रत्येक निमार्ता सल्लूमियाँला स्वत:च्या चित्रपटात घेण्यासाठी धडपडतो आहे. आता हेच पहा ना..प्रसिद्ध निमार्ता जोडी अब्बास-मस्तान यांनाही भाईजान सलमान त्यांच्या चित्रपटात हवा आहे.
‘रेस ३’या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटामध्ये सलमानला घेण्यास अब्बास-मस्तान उत्सूक आहेत. ‘रेस ३’मध्ये सलमानला मुख्य भूमिकेत घ्यायला आम्हाला आवडेल. आम्ही याबद्दल उत्सूक आहोत. पण सलमानने अद्याप आम्हाला कुठलाही होकार दिलेला नाही.  पुढील वर्षी आम्ही चित्रपटाचे फायनल कास्टिंग आणि इतर बाबींविषयी महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे,असे अब्बास-मस्तान यांनी सांगितले.  तिसºया भागात सैफ आणि अनिल कपूर असतील का? असे विचारले असता अद्याप त्याबद्दल काहीही सांगता येणार नाही,असे ते म्हणाले.
‘रेस’च्या पहिल्या दोन भागांनी बॉक्स आॅफिसवर उत्तम कमाई केली होती. २००८ मध्ये आलेल्या ‘रेस’ मध्ये  सैफ अली खान आणि अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते.

Web Title: Salman rejects for 'Race 3'