सर्वाधिक कमाईच्या यादीत सलमान नाही तर शाहरूख, अक्षय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 19:47 IST2016-07-12T14:17:53+5:302016-07-12T19:47:53+5:30

या वर्षांत सर्वाधिक कमाई करणाºया जगातील टॉप १०० सेलिब्रिटींमध्ये सलमान खान असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे मुळीच ...

Salman is not the highest grosser, but Shah Rukh, Akshay | सर्वाधिक कमाईच्या यादीत सलमान नाही तर शाहरूख, अक्षय

सर्वाधिक कमाईच्या यादीत सलमान नाही तर शाहरूख, अक्षय

वर्षांत सर्वाधिक कमाई करणाºया जगातील टॉप १०० सेलिब्रिटींमध्ये सलमान खान असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर तसे मुळीच नाही. या यादीत सलमान नाही तर बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि अक्षय कुमार यांची नावे आहेत. ‘फोर्ब्स’ने ही यादी जाहिर केली आहे. क्रीडा, कला, संगीत अशा सर्वच क्षेत्रांतील सर्वाधिक कमाई करणाºया १०० व्यक्तिंच्या नावाचा समावेश या यादीत आहे. यात अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट (कमाई १७ कोटी डॉलर) अव्वल क्रमांकावर आहे. या यादीत शाहरूख खान ८६ व्या क्रमांकावर आहे.  शाहरुख बॉलीवूडच्या बॉक्स आॅफिसवर राज्य करतो, असे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे. यादीनुसार, शाहरुख खान याची कमाई तीन कोटी 30 लाख डॉलर आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या यादीत ९४ व्या क्रमांकारवर आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्याचे स्थान घसरले आहे. गतवर्षी या यादीत तो ७६ व्या क्रमांकावर होता. त्याची कमाई १५ लाख डॉलर आहे.‘फोर्ब्स’ या यादीत अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट अव्वल क्रमांकावर आहे. तिच्या पाठोपाठ वन डायरेक्शन हा बँड दुसºया क्रमांकावर आहे.

टॉप १०

नाव                                        कमाई (मिलियन डॉलर)
१. टेलर स्विफ्ट, संगीतकार                 १७०
२. वन डायरेक्शन, बँड                       ११०
३. जेम्स पॅटर्सन, आॅथर                      ९५
४.फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो           ८८
५. डॉ. फिल मैक्ग्रा, टीव्?ही पर्सनैलिटी    ८८
६. केविन हर्ट, कॉमेडियन                     ८७.५
७. हॉवर्ड स्टर्न, रेडिओ/टीव्ही पर्सनॅलिटी    ८५
८. लियोनेल मैसी, फुटबॉलर                  ८१.५
९. अ‍ॅडली. संगीतकार                           ८्र०.०
१०. रश लिम्बॉ, टॉक शो अँकर                ७९
 

 
 

Web Title: Salman is not the highest grosser, but Shah Rukh, Akshay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.