सलमान खानच्या पार्टीत पोहोचली ‘नागिन’, मिस्ट्री गर्लसोबत दिसला अरबाज खान, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 20:05 IST2017-12-27T14:35:24+5:302017-12-27T20:05:24+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याने त्याचा ५२ वा वाढदिवस पनवेल स्थित फार्महाउसमध्ये सेलिब्रेट केला. यावेळी त्याने एका जोरदार पार्टीचेही ...

Salman Khan's 'Nagin', Arbaaz Khan appeared with Mystery Girl, see photo! | सलमान खानच्या पार्टीत पोहोचली ‘नागिन’, मिस्ट्री गर्लसोबत दिसला अरबाज खान, पाहा फोटो!

सलमान खानच्या पार्टीत पोहोचली ‘नागिन’, मिस्ट्री गर्लसोबत दिसला अरबाज खान, पाहा फोटो!

लिवूडचा दबंग सलमान खान याने त्याचा ५२ वा वाढदिवस पनवेल स्थित फार्महाउसमध्ये सेलिब्रेट केला. यावेळी त्याने एका जोरदार पार्टीचेही आयोजन केले होते. पार्टीत अनिल कपूर, कॅटरिना कैफ, बॉबी देओल, स्नेहा उलाल, निखिल द्विवेदी, निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याचबरोबर टीव्हीवर नागिनची भूमिका साकारणारी मौनी रॉयदेखील या पार्टीत पोहोचली होती. तसेच सलमानचा भाऊ अरबाज खान हादेखील मिस्ट्री गर्लसोबत पार्टीत बघावयास मिळाला. 









वास्तविक सलमानने अगोदरच मीडियाला स्पष्ट केले होते की, तो या बर्थ डे ला भारतात नसेल. परंतु पनवेलमधील पार्टीची बातमी तो गुपित ठेवू शकला नाही. कारण त्याच्या फार्महाउसवर फोटोग्राफर्स पाहुणे येण्याअगोदरच उपस्थित होते. पार्टीत उपस्थित असलेला प्रत्येक सेलिब्रिटी यावेळी कॅमेºयात कैद झाला. 











सलमानचा भाऊ अरबाज खानचाही यावेळी एक फोटो समोर आला. फोटोमध्ये तो एका मिस्ट्री गर्लसोबत कारमध्ये बसलेला दिसत आहे. वास्तविक त्याच्या या मिस्ट्री गर्लने कॅमेरे बघताच चेहरा लपविल्याने, छायाचित्रकारांना तिची छबी टिपता आली नाही. 
















दरम्यान, या पार्टीमुळे सलमान अनुष्का-विराटच्या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. कारण २६ डिसेंबर रोजी सलमानची फॅमिली पनवेल स्थित फार्महाउसमध्ये पोहोचली होती. 

Web Title: Salman Khan's 'Nagin', Arbaaz Khan appeared with Mystery Girl, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.