सलमान खानचं या विवाहित अभिनेत्रीवर आहे जीवापाड प्रेम, भाईजाननेच केला याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 06:10 PM2022-02-15T18:10:30+5:302022-02-15T18:11:09+5:30

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) लग्न कधी करणार, याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दरम्यान त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात तो बॉलिवूड अभिनेत्रीकडे प्रेम व्यक्त करताना दिसतोय.

Salman Khan's love for this married actress is revealed by him | सलमान खानचं या विवाहित अभिनेत्रीवर आहे जीवापाड प्रेम, भाईजाननेच केला याचा खुलासा

सलमान खानचं या विवाहित अभिनेत्रीवर आहे जीवापाड प्रेम, भाईजाननेच केला याचा खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan) लग्न कधी करणार, याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता तर म्हणे, सलमान खान बॉलिवूडमधील विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे. ही अभिनेत्री कोण असेल, याचा विचार तुम्ही करत असाल ना. तर सलमान खान सनी लिओनीच्या प्रेमात पडला आहे आणि इतकेच नाही तर त्याने कॅमेऱ्यासमोर तिच्याकडे प्रेम व्यक्त केले आहे. 

बिग बॉस ५मध्ये आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी स्पर्धक सनी लिओनीने पुन्हा एकदा बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली होती आणि हा सीझन होता बिग बॉस १४.बिग बॉस १४च्या विकेंड का वारमध्ये तिने हजेरी लावली होती. बिग बॉसचा ५वा सीझन आणि बिग बॉसचा १४व्या सीझनचा होस्ट सलमान खानच होता. जेव्हा बिग बॉस १४च्या मंचावर सनी लिओनी आली तेव्हाच त्याच्या नजरेतील भाव बदलले आणि तो अभिनेत्रीसोबत गोड गोड बोलू लागला.


सनी लिओनी आल्यावर सलमान खान मस्करीच्या मूडमध्ये आला होता आणि सनी लिओनीसोबत फ्लर्ट करू लागला. इतकेच नाही तर सनीला पाहून सलमान खान आजारी पडला होता. त्याच्यावर उपचारदेखील सनीने केले. खरेतर सलमान खान सनी लिओनीला म्हणाला की, त्याला लव्हेरिया झाला आहे. या शोचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत सनी लिओनी सलमानला विचारताना दिसते आहे की, तुम्हाला काय होतंय? त्यावर सलमान म्हणाला की, मला आता तुमच्यावर प्रेम झाले आहे. याला लव्हेरिया म्हणतात.
सलमान खानचे हे बोलणं ऐकून सनी सलमानला बोलते की, सलमा सलमान हे बघ मलाही झाले. सनीचा हा क्युट अंदाज पाहून सलमान तिला मिठी मारतो. सलमान खानचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Web Title: Salman Khan's love for this married actress is revealed by him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.