सलमान खानच्या या पूर्वप्रेयसीमुळे सलमान बनला चांगला डान्सर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 15:18 IST2017-12-26T09:48:10+5:302017-12-26T15:18:10+5:30
सलमान खानचे व्यवसायिक आयुष्य जितके चर्चेत असते, त्याहीपेक्षा त्याचे वैयक्तिक आयुष्य आजवर चर्चेत राहिले आहे. सलमानच्या आयुष्यात संगीत बिजलानी, ...

सलमान खानच्या या पूर्वप्रेयसीमुळे सलमान बनला चांगला डान्सर
स मान खानचे व्यवसायिक आयुष्य जितके चर्चेत असते, त्याहीपेक्षा त्याचे वैयक्तिक आयुष्य आजवर चर्चेत राहिले आहे. सलमानच्या आयुष्यात संगीत बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा अनेक अभिनेत्री आल्या पण आजही सलमान अविवाहित आहे. सलमान लग्न कधी करणार हा आजवर सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. सलमानला अनेक वेळा मीडिया याबद्दल विचारते. पण सलमान या प्रश्नाचे उत्तर देणे टाळतो किंवा माझ्या नशीबात असेल तर लग्न नक्कीच होईल असे म्हणत मीडियाला गप्प बसवतो. सलमानच्या पूर्वप्रेयसींमध्ये ऐश्वर्या वगळता त्याच्या सगळ्याच पूर्वप्रेयसी या त्याच्या आजही चांगल्या मैत्रिणी आहेत. सलमानच्या घरगुती कार्यक्रमात देखील त्या आवर्जून हजेरी लावताना दिसतात.
सलमानचे आणि संगीता बिजलानीसोबत अनेक वर्षं अफेअर होते. संगीता आणि सलमान लग्न देखील करणार होते. लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आल्या होत्या. पण ऐनवेळी हे लग्न रद्द झाले. संगीता आणि सलमानचे नाते तुटल्यानंतर संगीताने क्रिकेटर मोहोम्मद अझरुद्दीनशी लग्न केले. संगीता आणि सलमान यांचे ब्रेकअप होऊन अनेक वर्षं झाले असले तरी सलमानच्या वांद्र्याच्या घरात संगीताला अनेक वेळा पाहाण्यात येते. सलमानच्या कुटुंबियांसोबत संगीताचे आजही संबंध खूप चांगले आहेत आणि त्यामुळे ती त्याच्या घरी जाऊन सलमानच्या कुटुंबियांना भेटत असते.
![salman khan sangeeta bijlani]()
सलमान खानला बॉलिवूडमधील एक खूप चांगला डान्सर मानले जाते. त्याच्या डान्सवर केवळ तरुणीच नव्हे तर तरुण देखील फिदा आहेत. आपल्याला देखील सलमानसारखा डान्स करता यावा अशी त्यांची इच्छा असते. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमान हा पूर्वी इतका चांगला डान्सर नव्हता. त्याच्या एका पूर्वप्रेयसीमुळे तो खूप चांगला डान्सर बनला असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. सलमानने प्रेम रतन धन पायो या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी याविषयी खुलासा केला होता. सलमानने सांगितले होते की, सुरुवातीला मी चांगला डान्सर नव्हतो. मी माझ्या स्टेप्स आणि कोरिओग्राफरने सांगितलेल्या स्टेप मिक्स करायचो. पण दुसऱ्यांकडे पाहाण्यापेक्षा तू तुझ्या पद्धतीने नाचत जा असे मला संगीताने सांगितले होते. तिच्यामुळे मी चांगला डान्सर बनलो असे त्याने कबूल केले आहे.
Also Read : हा अभिनेता आजारी पडल्यामुळेच सलमान खानला मिळाला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक