Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:38 IST2025-10-16T14:36:01+5:302025-10-16T14:38:10+5:30
सलीम खान आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांचे फार जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
Salim Khan Meet Raj Thackeray : बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थान 'शिवतीर्थ' येथे भेट दिली. या दोन दिग्गजांच्या भेटीमुळे राजकीय आणि मनोरंजन विश्वात एकच चर्चा सुरू झाली आहे. या भेटीमागे नेमकं कारण काय आहे, याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सलीम खान 'शिवतीर्थ'वर पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचे अत्यंत आदराने स्वागत केले. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांनी स्वतः सलीम खान यांना आपलं निवासस्थान 'शिवतीर्थ' फिरवून दाखवले. यावेळी राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, प्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर आणि सलीम खान यांच्यात 'शिवतीर्थ'च्या बाल्कनीमध्ये गप्पा रंगल्याचे दृश्य दिसून आले. या भेटीदरम्यान काढलेला एक फोटो सध्या समोर आला आहे. या फोटोमध्ये सलीम खान आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावरती एक दिलखुलास हसू दिसून येत आहे.
ठाकरे आणि खान कुटुंबाचे संबंध खूप जुने आणि जिव्हाळ्याचे आहेत. यापूर्वीही राज ठाकरे यांनी अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्यातील कौटुंबिक स्नेह कायम आहे. मात्र, आता खुद्द सलीम खान यांनी राज ठाकरेंच्या घरी येऊन भेट घेतल्यामुळे या भेटीमागील कारणांची उत्सुकता वाढली आहे. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की राजकारण, चित्रपट किंवा सलमान खान संबंधित काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली, यावर सध्या माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
Mumbai, Maharashtra: Bollywood actor and film producer Salim Khan arrives at MNS chief Raj Thackeray's residence pic.twitter.com/jdoDwTmTrv
— IANS (@ians_india) October 16, 2025