बॉबी देओलनंतर भावाचे करिअर सावरणार सलमान खान; पाण्यासारखा पैसा ओतणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 14:39 IST2018-05-06T09:09:21+5:302018-05-06T14:39:21+5:30
बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सोहेल खान लवकरच छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. वृत्तानुसार तो एका टीव्ही सिरीजमध्ये बघावयास ...

बॉबी देओलनंतर भावाचे करिअर सावरणार सलमान खान; पाण्यासारखा पैसा ओतणार!
ब लिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सोहेल खान लवकरच छोट्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. वृत्तानुसार तो एका टीव्ही सिरीजमध्ये बघावयास मिळणार आहे. या शोचे वैशिष्ट म्हणजे त्यास बॉलिवूडचा दबंग सलमान खान प्रोड्यूस करणार आहे. रिपोर्टनुसार, हा शो महान रेसलर द ग्रेद गामा याच्या जीवनावर आधारित असेल. असे म्हटले जाते की, सलमानने बॉबी देओलचे जवळपास संपलेले करिअर सावरण्यासाठी त्याला ‘रेस-३’मध्ये महत्त्वाची भूमिका दिली. आता तो भाऊ सोहेलचे करिअर सावरण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजणार आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, या टीव्ही मालिकेची कथा पुनीत इस्सर यांनी लिहिली आहे. तसेच तेच या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. असेही सांगितले जात आहे की, मालिकेच्या टीमने गेल्या वर्षी पटियाला येथे मालिकेचा पहिला एपिसोड शूटही केला आहे. रिपोर्टनुसार, याबाबतचाही निर्णय घेण्यात आला की ही मालिका कोणत्या चॅनेलवर टेलिकास्ट केली जाईल. शोच्या पुढील एपिसोडची शूटिंग पंजाबनंतर मुंबई आणि लंडन येथील स्टेडियममध्ये केली जाईल.
![]()
पंजाबमध्ये जन्मलेले गामा त्यावेळी जगातील सर्वात मोठे नाव म्हणून पुढे आले होते. त्यांनी स्ट्रॉँगमॅन कॉम्पिटिशनही जिंकली होती. याव्यतिरिक्त गामा यांनी बºयाचशा विदेशी पहिलवानांबरोबर फाइट केली आहे. त्याचाच विचार करून सोहेल सध्या जीममध्ये घाम गाळत आहे. शिवाय तो तालमीलाही जात असल्याचे समजते. सलमानविषयी सांगायचे झाल्यास, सध्या तो त्याच्या ‘दस का दम’ या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा शो जूनमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.