शाहरुख खानच्या जागी 'बाजीगर'मध्ये लागली होती सलमान खानची वर्णी, पण या कारणामुळे भाईजानने सोडला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 01:01 PM2023-12-16T13:01:29+5:302023-12-16T13:07:51+5:30

सलमान खानने नाकारलेल्या सिनेमामुळे शाहरुख खान स्टार झाला हे फार कमी लोकांना माहिती आहे.

Salman khan wanted changes in the negative character of baazigar but director refused signed shah rukh khan | शाहरुख खानच्या जागी 'बाजीगर'मध्ये लागली होती सलमान खानची वर्णी, पण या कारणामुळे भाईजानने सोडला सिनेमा

शाहरुख खानच्या जागी 'बाजीगर'मध्ये लागली होती सलमान खानची वर्णी, पण या कारणामुळे भाईजानने सोडला सिनेमा

सलमान खान आणि शाहरुख खानची मैत्री तर जगजाहीर आहे. शाहरूख खानच्या 'पठाण' सिनेमात सलमान खानचा कॅमिओ होता. पण आज आम्ही तुम्हाला एक फारच इंटरेस्टींग गोष्ट सांगणार आहोत. सलमान खानने नाकारलेल्या सिनेमामुळे शाहरुख खान स्टार झाला. 

बॉलिवूडचा 1993 मध्ये आलेल्या अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट 'बाजीगर'बाबत सलमान खानने मोठा खुलासा केला होता. अभिनेत्याने सांगितले की, शाहरुखच्या आधी त्याला 'बाजीगर' सिनेमाची ऑफर देण्यात आली होती, परंतु सलमानला चित्रपटात काही बदल हवे होते, त्यामुळे त्याने चित्रपट करण्यास साफ नकार दिला. अभिनेत्याने नकार दिल्यानंतर या चित्रपटातील 'विकी मल्होत्रा'ची भूमिका शाहरुख खानला ऑफर करण्यात आली होती.

सलमान खानने कपिल शर्माच्या शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितले होते की, त्याला 'बाजीगर' आवडला, पण मुख्य भूमिका खूप नेगेटीव्ह वाटली. मी काही बदललं सुचवलं होतं परंतु चित्रपटात कोणताही बदल न झाल्याने मी बाजीगर सोडला आणि शाहरुखने चित्रपट साइन केला. शाहरूख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टीच्या 'बाजीगर' सिनेमा 1993 मध्ये रिलीज झाला होता. शाहरूख खानचा हा सिनेमा खूप गाजला होता. त्याच्या भूमिकेला खूप पसंत केलं गेलं होतं. हा त्याच्या करिअरमधील सगळ्यात यशस्वी सिनेमांपैकी एक मानला जातो. 

Web Title: Salman khan wanted changes in the negative character of baazigar but director refused signed shah rukh khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.