​ सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी! ‘रेस3’च्या सेटवर सशस्त्र लोकांचा धिंगाणा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 06:25 AM2018-01-11T06:25:13+5:302018-01-11T11:55:13+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याच्या चित्रपटाच्या सेटवर काही  सशस्त्र लोकांनी हल्ला केल्याची खबर आहे. होय, सलमान ‘रेस3’ या त्याच्या ...

Salman Khan threatens to kill again! Armed people in a set of 'Res3'! | ​ सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी! ‘रेस3’च्या सेटवर सशस्त्र लोकांचा धिंगाणा!!

​ सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी! ‘रेस3’च्या सेटवर सशस्त्र लोकांचा धिंगाणा!!

googlenewsNext
लिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याच्या चित्रपटाच्या सेटवर काही  सशस्त्र लोकांनी हल्ला केल्याची खबर आहे. होय, सलमान ‘रेस3’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर शूटींग करत असताना काही सशस्त्र लोक आत शिरले व त्यांनी गोंधळ घालणे सुरु केले. या लोकांनी सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही कळते. या घटनेनंतर ‘रेस3’चे शूटींग त्वरित थांबवण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीवर ‘रेस3’चा सेट लावण्यात आला आहे. ९ जानेवारीला या सेटवर चित्रपटाचे सगळे युनिट शूटींगमध्ये व्यस्त असताना काही लोक बळजबरीने सेटच्या आत घुसलेत. यानंतर सेटवर त्यांनी गोंधळ घालणे सुरु केले. शिवाय सलमानला धमक्याही दिल्यात. यानंतर त्वरित पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही क्षणात डझनावर पोलिस ‘रेस3’च्या सेटवर पोहोचले. यानंतर पोलिसांनीच सलमानला त्याच्या बांद्रा येथील निवासस्थानी सोडून दिले. ‘रेस3’च्या सेटवर धिंगाणा घालणारे हे लोक राजस्थानातील एका विशिष्ट समाजाचे होते.
गत आठवड्यातही सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. गत आठवड्यात सलमान काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयासमोर हजर झाला होता. यादरम्यान राजस्थानचा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला खुली धमकी दिली होती. आता आम्ही जे ही करू ते सर्वांदेखत करून. सलमानला तर आम्ही जोधपूरमध्येच मारू, असे त्याने म्हटले होते. काळवीट शिकार प्रकरणामुळे बिश्नोई समाजात सलमानविरोधात संतापाची भावना आहे. याच पार्श्वभूमीवर बिश्नोई समाजाशी संबंधित लॉरेन्स बिश्नोईने जोधपूर कोर्टाबाहेर सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. बिश्नोई समाज गत ५०० वर्षांपासून काळवीटांच्या संरक्षणासाठी काम करतो आहे. लॉरेन्स बिश्नोई हा एक विद्यार्थी नेता आहे. त्याच्यावर पंजाब, हरियाणा, चंदीगड व राजस्थानात खंडणी वसूली, गोळीबार आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. फरीदकोट पोलिसांनी ५ मार्च २०१५ रोजी लॉरेन्सला विदेशी शस्त्रांसह अटक केली होती. याचप्रकरणात लॉरेन्सला अलीकडे जोधपूर न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

ALSO READ : BOX OFFICE : तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स आॅफिसवर ‘टायगर जिंदा है’!

Web Title: Salman Khan threatens to kill again! Armed people in a set of 'Res3'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.