सलमान खान या चित्रपटासाठी जिममध्ये गाळतोय घाम, वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते झाले चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 17:13 IST2021-07-21T17:13:14+5:302021-07-21T17:13:37+5:30
सलमान खानचा जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.

सलमान खान या चित्रपटासाठी जिममध्ये गाळतोय घाम, वर्कआउटचा व्हिडीओ पाहून चाहते झाले चकीत
बॉलिवूडचा दंबग खान सलमान बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो. कधी चित्रपटामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे. सध्या तो चर्चेत आला आहे त्याचा आगामी चित्रपट टाइगर ३मुळे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तो खूप मेहनत घेताना दिसतो आहे. नुकताच सलमानने सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ जीममधील असून तो घाम गाळताना दिसतो आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.
सलमान खानने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत तो जीममध्ये वर्कआउट करताना दिसतो आहे. हा मिरर व्हिडीओ आहे. यात सलमानच्या चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी सलमान खान व्यायाम करत असल्याचे समजते आहे. या व्हिडीओत ‘टायगर जिंदा है’चे म्युझिक ऐकायला मिळते आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, मला वाटते ही व्यक्ती टाइगर ३साठी ट्रेनिंग घेत आहे.
सलमान खानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून सलमानच्या चाहत्यांकडून व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. तसेच सलमानच्या या मेहनतीचे चाहते कौतुक करत आहेत.
टाइगर ३ या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेता इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान प्रमाणेच इमरानदेखील त्याच्या फिटनेकडे लक्ष देतो आहे. पुन्हा एकदा या चित्रपटात सलमान खान एजेंट अविनाश सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा जोयाच्या भूमिकेत दिसणार आहे.