सलमानच्या 'एक्स-गर्लफ्रेंड'साठी कारचा दरवाजा उघडत होता शेरा, 'भाईजान'नं रोखलं अन् सुनावलं! पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 12:47 PM2022-12-27T12:47:36+5:302022-12-27T12:49:32+5:30

बॉलीवूडचा 'दबंग' सुपरस्टार सलमान खान याच्या वाढदिवसाची काल रात्री जंगी पार्टी झाली.

salman khan stop shera bodyguard while car door opening for sangeeta bijlani birthday party watch video | सलमानच्या 'एक्स-गर्लफ्रेंड'साठी कारचा दरवाजा उघडत होता शेरा, 'भाईजान'नं रोखलं अन् सुनावलं! पाहा VIDEO

सलमानच्या 'एक्स-गर्लफ्रेंड'साठी कारचा दरवाजा उघडत होता शेरा, 'भाईजान'नं रोखलं अन् सुनावलं! पाहा VIDEO

googlenewsNext

मुंबई- 

बॉलीवूडचा 'दबंग' सुपरस्टार सलमान खान याच्या वाढदिवसाची काल रात्री जंगी पार्टी झाली. सलमानची बहिण अर्पिताच्या घरी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पार्टीला बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी अभिनेत्री संगीता बिजलानी हिनं. पार्टीनंतर सलमान स्वत: संगीता बिजलानी हिला सोडायला बाहेर आला होता. यावेळी दोघांमधील 'स्पेशल बॉन्ड' पाहायला मिळाला. 

ब्लॅक शाइन जीन्स आणि ब्लॅक फूलस्लीव्हज टी-शर्टमध्ये सलमान हॅण्डसम हंक दिसत होता. तर संगीता बिजलानी हिनं ब्लू वन पीस परिधान केला होता. पार्टीनंतर सलमान संगीता बिजलानी हिला गुडबाय करण्यासाठी घराच्या गेटपर्यंत आला होता. यावेळी सलमानसोबत त्याचा बॉडीगार्ड शेरा देखील होता. सलमाननं संगीताला 'जादू की झप्पी' देत गुडबाय केलं आणि पार्टीला आल्याबद्दल आभारही व्यक्त केले. कारमध्ये संगीता बिजलानी बसायला जाणार इतक्यात एक अशी घटना कॅमेरात कैद झाली ज्याची चर्चा होऊ लागली आहे. 

पाहा VIDEO

सलमान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा या दोघांमध्ये आजवर चांगला बॉण्ड राहिला आहे. शेरा अनेक वर्षांपासून सलमानचा खासगी बॉडीगार्ड म्हणून सेवेत आहे. पण अनेकदा शेराला सलमानचा ओरडा देखील खावा लागतो. याचंच उदाहरण यावेळी पाहायला मिळालं. संगीता बिजलानी कारमध्ये बसण्यासाठी जात असताना शेरा कारचा दरवाजा उघडण्यासाठी पुढे सरसावला. पण सलमाननं त्याला टोकलं आणि मी असताना तुला दरवाजा उघडायची काय गरज अशा भावनेनं सलमान शेराला सुनावतानाचा क्षण कॅमेरात टिपला गेला. नेटिझन्सनं नेमकं हेच हेरलं आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. 

Web Title: salman khan stop shera bodyguard while car door opening for sangeeta bijlani birthday party watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.