सलमान खान करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, मातीत माखलेला फोटोंनी वेधले सा-यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 15:41 IST2020-07-15T15:41:14+5:302020-07-15T15:41:31+5:30

सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलेल्या फोटोला ''दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, जय जवान, जय किसान'', असं कॅप्शन दिलं आहे.

Salman Khan spends his day toiling in the field at his Panvel farmhouse, shares a mud-covered picture of himself | सलमान खान करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, मातीत माखलेला फोटोंनी वेधले सा-यांचे लक्ष

सलमान खान करतोय ‘काळ्या आई’ची सेवा, मातीत माखलेला फोटोंनी वेधले सा-यांचे लक्ष

कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. शुटिंगच्या धबडग्यात त्यांना इतर गोष्टींसाठी किंवा आपल्या कुटुंबीयांना वेळ देणं तितकं शक्य नसतं. मात्र लॉकडाऊनमुळे हे शक्य झाले आहे. सर्वसमान्यापासून ते सेलिब्रेटींचे सर्वांचे आयुष्यच बदलले आहे. लॉकडाऊनमुळे कलाकार कुटुंबासह एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत. इतर गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढतात. आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींसाठी ते वेळ राखून ठेवतात. 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खान पनवेल येथील त्याच्या फॉर्महाऊसवर आपला वेळ घालवत आहे. येथे तो त्याच्या कुटुंबियांसोबत मस्त एन्जॉय करतानाही पाहायला मिळते. मध्यंतरी जॅकलिन फर्नांडिसही त्याच्याबरोबर राहत होती. पण मैत्रीणीच्या मदतीसाठी तडकाफडकी तिथून निघून गेली होती. तुर्तास वेळ घालवण्यासाठी सलमान फार्महाऊसवर विविध गोष्टी करताना दिसतो. सलमानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये सलमान शेती करताना पाहायला मिळतोय.  मातीत माखलेला, घामाने भिजलेला सलमानचे हे फोटो सध्या सा-यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकलेल्या फोटोला ''दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, जय जवान, जय किसान'', असं कॅप्शन दिलं आहे. सलमानचं हे फार्महाऊस दीडशे एकर जागेत पसरलं आहे. आजूबाजूला डोंगर अन् त्या मधोमध हे विस्तीर्ण आलिशान असं सलमानचं फार्महाऊस पसरलंय. स्विमिंग पूल, बाईक रायडिंग आणि घोडेस्वारीसाठी या फार्महाऊसमध्ये विशेष जागा ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी सलमानचे अनेक घोडेसुद्धा आहेत.
 

Web Title: Salman Khan spends his day toiling in the field at his Panvel farmhouse, shares a mud-covered picture of himself