सलमान खानने 'राधे' सिनेमातून रजत बेदीला दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला-"जेव्हा भाईला समजलं तेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:25 IST2025-10-09T17:24:21+5:302025-10-09T17:25:16+5:30
Salman Khan And Rajat Bedi : 'कोई मिल गया' आणि 'जानी दुश्मन'सारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारलेला रजत बेदी अनेक वर्षांनी 'राधे'मधून कमबॅक करणार होता. मात्र, सलमान खानमुळे हा चित्रपट त्याच्या हातातून निसटला.

सलमान खानने 'राधे' सिनेमातून रजत बेदीला दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला-"जेव्हा भाईला समजलं तेव्हा..."
२०२१ मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'राधे' चित्रपटात दिशा पाटनी, रणदीप हुड्डा आणि गौतम गुलाटीसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केलं होतं. ही अॅक्शन थ्रिलर सिनेमा जेव्हा बनत होता, तेव्हा या चित्रपटातून एका अभिनेत्याचं कमबॅक होणार होतं. खुद्द प्रभू देवाने एका भूमिकेसाठी या अभिनेत्याला कास्ट केलं होतं. हा अभिनेता म्हणजे रजत बेदी. 'कोई मिल गया' आणि 'जानी दुश्मन'सारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारलेला रजत बेदी अनेक वर्षांनी 'राधे'मधून कमबॅक करणार होता. मात्र, सलमान खानमुळे हा चित्रपट त्याच्या हातातून निसटला.
रेडिटवर रजत बेदीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो 'राधे' चित्रपटातून काढले गेल्याबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणाला की, "मी 'राधे'ची ऑफर स्वीकारली होती. मला मुकेश छाब्रा यांच्या ऑफिसमधून फोन आला की, तुमची 'राधे'साठी निवड झाली आहे. मी आनंदाने चित्रपटाच्या लेखकाला भेटलो. तेही खूप खूश होते. 'राधे'मुळे मला वाटलं की खूप छान कमबॅक मिळेल. खूप चांगला प्रोजेक्ट आणि विशेषतः भाईसोबत काम करण्याची इच्छा तर प्रत्येकाचीच असते."
सलमानने केलेलं रजत बेदीला रिप्लेस
रजत बेदीने सांगितलं की, त्याचे सलमान खानसोबत पारिवारिक संबंध आहेत, कारण त्यांचे वडील आणि आजोबा सलमानचे वडील सलीम खान यांच्या खूप जवळचे होते. पण, जेव्हा सलमानला रजतच्या कास्टिंगबद्दल समजले, तेव्हा त्याने या चित्रपटातून रजत बेदीला बाहेर काढले. याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, "भाईने (सलमान) मला बोलावले. जेव्हा भाईला कळले की रजत ती भूमिका करणार आहे, तेव्हा भाई मला म्हणाला, 'रजत, तू थोडी प्रतीक्षा कर. मी तुला 'राधे'पेक्षाही चांगले कमबॅक देऊ इच्छितो.'"
रजत बेदी पुढे म्हणाला, "जेव्हा भाईने मला हे सांगितले, तेव्हा मी गप्प राहिलो. तो म्हणाला, 'रजत, तुझी उंची, शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व खूप चांगले आहे. तू स्वतःला खूप चांगल्या प्रकारे मेन्टेन केले आहेस. तू वाट बघ. मी तुला एक उत्तम कमबॅक देणार आहे.' भाईला कोण नकार देऊ शकतं?"