छोट्या पडद्यावर सलमान खान-शाहरुख खान येणार आमने- समाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 11:01 IST2017-07-29T05:22:29+5:302017-07-29T11:01:07+5:30

सलमान खान आणि शाहरुख खान आतपर्यंत एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसले आहे. आता इंटस्ट्रीतले हे दोन खान एकमेकांसमोर उभे ...

Salman Khan-Shahrukh Khan will come to the small screen on a regular basis | छोट्या पडद्यावर सलमान खान-शाहरुख खान येणार आमने- समाने

छोट्या पडद्यावर सलमान खान-शाहरुख खान येणार आमने- समाने

मान खान आणि शाहरुख खान आतपर्यंत एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसले आहे. आता इंटस्ट्रीतले हे दोन खान एकमेकांसमोर उभे राहताना दिसणार आहेत. टेलीचक्करने दिलेल्या रिपोर्टनुसार शाहरुख खान टेड टॉक : नयी सोच हा टीव्ही शो तर सलमान खानच्या बिग बॉसचा 11वा सीजन एकच वेळेस रिलीज होणार आहेत. या पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार किंग खानच्या नवा शो टेड टॉक: नयी सोचचा प्रोमो 19 ऑगस्टला शूट करणार आहे तर सलमान खान बिग बॉस 11च्या प्रोमोचे शूट 30 जुलैला करणार आहे. शाहरुखचा शो रात्री 9 वाजता टेलिकास्ट होणार तर सलमानचा शो रात्री 10:30 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.     
छोट्या पडद्यावर सलमानची पॉप्युलारिटी ही शाहरुखपेक्षा जास्त आहे. किंग खानने या आधी 'कौन बनेगा करोडपती' आणि 'पाचवी पाससे तेज' या शो चे सूत्रसंचालन केले आहे मात्र म्हणावे तसे यश त्याच्या शो ला मिळाले नाही. तर दुसरीकेड सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसची टीआरपी सगळ्यात जास्त आहे. ऐवढचे नाही तर सलमान लवकरच दस का दम हा शो सुद्धा छोट्या पडद्यावर पुन्हा घेऊन येणार असल्याचे समजते आहे.  

ALSO READ :  आर्यन आणि सुहाना खानला सलमान खानने दिले 'हे' स्पेशल गिफ्ट!

काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते मी ऑगस्टमध्ये माझ्या शो चे शूटिंग सुरु करतो आहे. यानंतर तो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दोन्ही स्टार्समध्ये कोण बाजी मारते हे पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागले. सध्या शाहरुख खान त्याचा आगामी चित्रपट जब हैरी मेट सेजलच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.   

Web Title: Salman Khan-Shahrukh Khan will come to the small screen on a regular basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.