"मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान मला घाबरायचा, कारण.."; लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलेला खुलासा, म्हणाले- "मला पाहताच तो..."

By देवेंद्र जाधव | Updated: June 4, 2025 17:39 IST2025-06-04T17:38:02+5:302025-06-04T17:39:49+5:30

मैने प्यार किया सिनेमाच्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डेंना सलमान घाबरायचा. कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Salman khan scared with laxmikant berde on the sets of Main Pyar Kiya bhagyashree | "मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान मला घाबरायचा, कारण.."; लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलेला खुलासा, म्हणाले- "मला पाहताच तो..."

"मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान मला घाबरायचा, कारण.."; लक्ष्मीकांत बेर्डेंनी केलेला खुलासा, म्हणाले- "मला पाहताच तो..."

आज लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) आपल्यात नसले तरीही त्यांचे सिनेमे आजही सर्वांच्या आवडीचे आहेत. लक्ष्याचे सिनेमे लागले की सर्व टीव्हीसमोर बसतात आणि खळखळून हसतात. मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार लक्ष्याने पुढे बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख कमावली. लक्ष्याने सलमान खानच्या (salman khan) 'मैने प्यार किया'च्या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. परंतु सिनेमाच्या सेटवर मात्र लक्ष्मीकांत यांच्यासोबत सलमान अजिबात बोलत नव्हता. काय घडलं होतं नेमकं. जाणून घ्या

लक्ष्याशी सलमान का बोलत नव्हता?

लक्ष्मीकांत बेर्डेंनी 'मैने प्यार किया' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या सिनेमात सलमान खान प्रमुख भूमिकेत होता. जेव्हा लक्ष्या आणि सलमान सेटवर पहिल्यांदा एकमेकांसमोर आले तेव्हा लक्ष्याला बघून सलमान दूर निघून जायचा. सलमान लक्ष्याशी काहीच बोलत नव्हता. यामागचं कारण म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यावेळी मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार होते. त्यांची चर्चा हिंदी इंडस्ट्रीतही होती. अशातच सलमानला कोणीतरी सांगितलं होतं की, "लक्ष्यापासून लांब राहा. तो आयत्यावेळी सीनमध्ये improvise करतो." हे ऐकल्यानंतर सलमान काहीसा घाबरला होता. त्यामुळे तो लक्ष्या जिथे दिसेल तिथून पळ काढायचा. 


शेवटी लक्ष्यानेच सलमानला विचारलं- "मला बघून असं दूर का जातोस?" सलमानच्या मनातला गैरसमज लक्ष्याने दूर केला. त्यानंतर सलमानही लक्ष्याशी बोलायला लागला. दोघांचे एकत्र सीन्स छान शूट झाले. सिनेमातली हिरोईन भाग्यश्री ही मराठीच होती, त्यामुळे भाईजानच्या मनातील गैरसमज दूर करण्यात तिचीही लक्ष्याला मदत झाली. आजही 'मैने प्यार किया' सिनेमातील लक्ष्या आणि सलमानची जोडी लोकांच्या आठवणीत  आहे. सलमान सुद्धा अनेकदा जाहीर इव्हेंटमध्ये लक्ष्याची आठवण काढताना दिसतो.

Web Title: Salman khan scared with laxmikant berde on the sets of Main Pyar Kiya bhagyashree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.