सलमान खान म्हणतोय 'कभी ईद कभी दिवाली', जाणून घ्या यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 18:16 IST2020-01-10T18:16:06+5:302020-01-10T18:16:24+5:30

सलमान खानचा काही दिवसांपूर्वी दबंग ३ चित्रपट प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

Salman Khan says 'Kabhi Eid Kabhi Diwali', the reason for knowing this | सलमान खान म्हणतोय 'कभी ईद कभी दिवाली', जाणून घ्या यामागचं कारण

सलमान खान म्हणतोय 'कभी ईद कभी दिवाली', जाणून घ्या यामागचं कारण

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचा दबंग ३ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आता सलमान खानने नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव 'कभी ईद कभी दिवाली' असे असून सलमान साजिद नाडियादवालासोबत चित्रपट करणार आहे. 

सलमान खानने सोशल मी़डियावर त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. त्याने म्हटलं की, माझ्या पुढील चित्रपटाची घोषणा करतोय कभी ईद कभी दिवाली. या चित्रपटाची कथा व निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे.




कभी ईद कभी दिवाली हा चित्रपट २०२१ या वर्षातील ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. 



 

दरम्यान, यावर्षी सलमान खान राधे: युवर मोस्ट वॉण्टेड भाई या चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटात तो दिशा पटानी सोबत दिसणार आहे. हा चित्रपट प्रभुदेवा यांनी दिग्दर्शित केला आहे.

Web Title: Salman Khan says 'Kabhi Eid Kabhi Diwali', the reason for knowing this