सलमान खानला नको नॅशनल अ‍ॅवॉर्ड; कारणही वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 12:37 PM2019-05-21T12:37:19+5:302019-05-21T12:50:01+5:30

बॉक्सआॅफिसवरचे जुने विक्रम तोडत, नव नवे विक्रम प्रस्थापित करणे, हेच जणू सलमानचे काम. पण राष्ट्रीय पुरस्काराबाबत मात्र सलमानची झोळी कायम खाली राहिली.

salman khan says i dont want national award | सलमान खानला नको नॅशनल अ‍ॅवॉर्ड; कारणही वाचा

सलमान खानला नको नॅशनल अ‍ॅवॉर्ड; कारणही वाचा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘भारत’ या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहेत.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याने आपल्या तीन दशकांच्या फिल्मी करिअरमध्ये शेकडो चित्रपट केलेत. यापैकी बहुतांश चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. बॉक्सआॅफिसवरचे जुने विक्रम तोडत, नव नवे विक्रम प्रस्थापित करणे, हेच जणू सलमानचे काम. पण राष्ट्रीय पुरस्काराबाबत मात्र सलमानची झोळी कायम खाली राहिली. इतक्या वर्षांत सलमानला कधीही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला नाही. अलीकडे एका मुलाखतीत, सलमानला नेमके याचबद्दल विचारण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, असे तुला कधीच वाटत नाही का? असा प्रश्न सलमानला केला गेला. पण प्रश्न पूर्ण होण्याआधीच, मला नको राष्ट्रीय पुरस्कार, असे सलमान म्हणाला. असे का? हेही त्याने सांगितले.
मला कुठलाही पुरस्कार नको. ना नॅशनल अ‍ॅवॉर्ड ना अन्य कुठला अ‍ॅवॉर्ड . मला फक्त रिवॉर्ड हवा. लोक माझा सिनेमा पाहायला चित्रपटगृहात जातात, तोच माझ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार असतो. संपूर्ण देशाने माझा चित्रपट पाहावा एवढेच. यापेक्षा मोठा पुरस्कार आणखी कुठला असू शकतो, असे तो म्हणाला.


सलमान खान सध्या ‘भारत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाबद्दलही त्याने माहिती दिली. ‘भारत’ हा चित्रपट एका कोरियन चित्रपटावर बेतलेला आहे. आम्हाला एका कोरियन चित्रपटाचा प्लॉट आवडला. आम्ही केवळ प्लॉट घेतला आणि त्यावर अख्खा चित्रपट बनवला, असे त्याने सांगितले.


‘भारत’ या चित्रपटात सलमान खान आणि कतरीना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय तब्बू, दिशा पाटनी, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहेत.

Web Title: salman khan says i dont want national award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.