राज-डीकेच्या आगामी सिनेमात सलमान खानची एन्ट्री? 'या' कारणामुळे केली अभिनेत्याची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:01 IST2026-01-06T13:59:21+5:302026-01-06T14:01:39+5:30
'द फॅमिली मॅन' सीरिजचे दिग्दर्शक राज-डीके जोडीसोबत आता सलमान खान काम करणार?

राज-डीकेच्या आगामी सिनेमात सलमान खानची एन्ट्री? 'या' कारणामुळे केली अभिनेत्याची निवड
अभिनेता सलमान खान आगामी 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणार आहे. सिनेमात तो आर्मी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने ६० वा वाढदिवस साजरा केला. नवीन वर्षाच्या सलमानच्या हाती मोठा सिनेमा लागला असल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी राज-डीकेसोबत सलमान काम करणार आहे. राज-डीके 'द फॅमिली मॅन' सीरिजमुळे ओळखले जातात.
पिंकविला रिपोर्टनुसार, राज-डीके आपल्या आगामी सिनेमासाठी अशा अभिनेत्याचा शोध घेत आहेत ज्याच्याकडे शार्प ह्युमर असेल. यासोबतच तो स्टायलिश अंदाजात अॅक्शन सीन्सही करेल. यासाठी राज-डीकेच्या समोर सलमान खानचंच नाव दिसलं. पहिल्यांदाच दोघंही सलमानसोबत काम करतील. सलमानलाही सिनेमाची बेसिक आयडिया पसंत पडली आहे आणि त्याने सिनेमा करण्याची इच्छाही दर्शवली आहे. दरम्यान दोघांमध्ये फायनल चर्चा होणं अद्याप बाकी आहे. जर सगळं सुरळीत झालं तर सलमान यावर्षीच सिनेमाचं शूटही सुरु करेल असा अंदाज आहे.
अद्याप सलमानने सिनेमा साईन केलेला नाही. सध्या त्याचं व्यग्र शेड्युल पाहून सिनेमासाठीच्या टाईमलाइनवर चर्चा सुरु आहे. राज -डीकेही सिनेमाच्या स्क्रिप्टवर शेवटचं काम करत आहेत. स्क्रिप्टला क्रिएटिव्ह रुप देण्यात येत आहे.
सलमान खानचा 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमा सध्या चर्चेत आहे. अपूर्व लखिया यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. २०२० साली गलवान खोऱ्यात झालेल्या भारत विरुद्ध चीन संघर्षावर सिनेमा आधारित आहे. या सिनेमात सलमानसोबत चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.