सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:00 IST2025-12-29T10:59:29+5:302025-12-29T11:00:05+5:30
सलमान खान की वायआरएफ, कोण सिनेमा पुढे ढकलणार?

सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
'दबंग' अभिनेता सलमान खानने नुकताच ६० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. सलमानच्या वाढदिवसाला सिनेमाचा टीझर आला आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. सलमानचा लूक, त्याचे डायलॉग्स टीझरमध्येच हिट झालं. १७ एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार आलिया भटचा बहुप्रतिक्षित 'अल्फा' सिनेमाही त्याच दिवशी रिलीज होणार होता. मात्र आता सलमानच्या सिनेमामुळे 'अल्फा'चे मेकर्स रिलीज डेट पोस्टपोन करतील अशी शक्यता आहे.
'वायआरएफ'चा 'अल्फा' हा स्पाय ॲक्शन थ्रिलर सिनेमा आहे. त्यांच्या स्पाय युनिव्हर्सचा हा सातवा सिनेमा आहे. शिव रावेल यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात आलिया आणि शर्वरी दमदार ॲक्शन अवतारात दिसणार आहेत. तसंच बॉबी देओल आणि अनिल कपूरचीही यात भूमिका असणार आहे. तरण आदर्श यांच्या रिपोर्टनुसार, 'अल्फा' १७ एप्रिल रोजी रिलीज करण्याची तयारी होती. मात्र सिनेमा सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'सोबत क्लॅश होत आहे. त्यामुळे आता 'अल्फा'चा निर्माता आदित्य चोप्रा सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याच्या विचारात आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.
'अल्फा' पहिल्यांदाच पोस्टपोन होत नाहीये. याआधी सिनेमा याचवर्षी ख्रिसमसला रिलीज होणार होता. मात्र व्हीएफएक्सचं काम अपुरं राहिल्याने सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन झाली होती. आता परत 'अल्फा' पुढे ढकलला जाऊ शकतो. तर दुसरीकडे सलमानचा 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमा २०२० साली झालेल्या इंडो चायना संघर्षावर आधारित आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चायनामध्ये संघर्ष झाला होता ज्यात भारतीये सैन्याने कोणतंही हत्यार नसताना लाठ्या काठ्यांनी लढाई लढली होती. सिनेमात सलमानसोबत चित्रांगदा सिंह आहे.