सलमान खानच्या ‘रेकॉर्ड’वर चढणार का आयुष शर्माचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 10:41 IST2018-08-13T10:39:36+5:302018-08-13T10:41:39+5:30

गेल्या काही वर्षांत सलमानने आपल्या स्टारडमच्या भरवशावर अनेक नवे चेहरे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. पण रेकॉर्ड तपासला तर सलमानने लॉन्च केलेल्या चेहऱ्यांना म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. 

salman khan record can make trouble for brother in law ayush sharma? | सलमान खानच्या ‘रेकॉर्ड’वर चढणार का आयुष शर्माचे नाव?

सलमान खानच्या ‘रेकॉर्ड’वर चढणार का आयुष शर्माचे नाव?

बॉलिवूडच्या फ्लॉप कलाकारांचा तारणहार अशीच अलीकडच्या काळात सलमान खानची ओळख बनली आहे. गेल्या काही वर्षांत सलमानने आपल्या स्टारडमच्या भरवशावर अनेक नवे चेहरे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. पण रेकॉर्ड तपासला तर सलमानने लॉन्च केलेल्या चेहऱ्यांना म्हणावे तसे यश मिळवता आले नाही. त्याने लॉन्च केलेले अनेक चेहरे आलेत आणि गेलेत, काही फ्लॉप चेह-यांना उभारी देण्याचे कामही सलमानने केले. पण तिथेही तो फार यशस्वी ठरला नाही. त्यामुळेच सलमानचा मेहुणा आयुष शर्मा याच्या बॉलिवूडमधील भवितव्यावरही भलेमोठे प्रश्नचिन्ह आहेच.

 आयुषचा डेब्यू सिनेमा ‘लवरात्रि’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. पण या ट्रेलरला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मेहुण्याचा चित्रपट असल्याने सलमानच्या टीमने ‘लवरात्रि’ला प्रमोट करण्यात कुठलीही कसूर सोडली नाही. पण तरिही सोशल मीडियावर ‘लवरात्रि’चा ट्रेलर हिट झाला नाही. (‘लवरात्रि’चा ट्रेलर हिट झाल्याच्या बातम्या मग जाणीवपूर्वक छापून आणाव्या लागल्यात) साहजिकचं सलमानने लॉन्च केलेल्या अनेकांप्रमाणे आयुषचा डेब्यूही फ्लॉप होणार नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे.
‘लवरात्रि’च्या ट्रेलरवरून या चित्रपटाची कथा स्पष्ट झाली आहे. अमेरिकेत राहणारी एक तरूणी गुजरातेत येते आणि एका गरबा शिकवणा-या तरूणाच्या प्रेमात पडते. नवरात्रीत त्यांचे प्रेम बहरते आणि नवरात्र संपताचं, मुलगी आपल्या देशात परतते. हिरोला तिचा विरह सहन होत नाही आणि तिला मिळवण्यासाठी तो विदेशात पोहोचतो. हिरोईनचे वडिल या लव्हस्टोरितील खलनायक तर हिरोचे वडिल या लव्हस्टोरितील नायक असतात. एकंदर काय तर चावून चावून चोथा झालेलीचं एक प्रेमकथा या चित्रपटात आहे. जाणकारांच्या मते, ही कथा आयुषला भारी पडू शकते़ आधी सलमान या चित्रपटात कॅमिओ करणार, अशी खबर होती़ पण असे काहीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे, सलमानच्या जोरावर चित्रपट हिट होण्याच्या शक्यताही संपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयुष शर्माचा डेब्यू हिट होणार की फ्लॉप हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: salman khan record can make trouble for brother in law ayush sharma?