Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser : सलमानचा अ‍ॅक्शनपॅक्ड अवतार, आता पाहा 'किसी का भाई किसी की जान'चा ओरिजनल टीझर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:24 PM2023-01-25T17:24:09+5:302023-01-25T17:24:23+5:30

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Out : १ मिनिट ४३ सेकंदाच्या या टीझरमध्ये भाईजान हटके लुकमध्ये पाहायला मिळतोय.

Salman Khan Pooja Hegde Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Out | Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser : सलमानचा अ‍ॅक्शनपॅक्ड अवतार, आता पाहा 'किसी का भाई किसी की जान'चा ओरिजनल टीझर

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser : सलमानचा अ‍ॅक्शनपॅक्ड अवतार, आता पाहा 'किसी का भाई किसी की जान'चा ओरिजनल टीझर

googlenewsNext

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Out : शाहरूखचा 'पठाण' हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि किंगखानचे चाहते क्रेझी झालेत. फक्त किंगखानचेच चाहते नाही तर भाईजानचे चाहतेही सुखावलेत. कारण 'पठाण' चित्रपटासोबत प्रेक्षकांना एक ट्रीटदेखील मिळाली. शाहरुखच्या चित्रपटासोबत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या आगामी चित्रपटाचा टिझर थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला. पाठोपाठ ऑफिशिअल टीझर युट्यूबवरही रिलीज करण्यात आला आहे. यात सलमान दमदार रोलमध्ये दिसतोय.

फरहाद सामजीने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसह व्यंकटेश, पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव जुयाल व पलक तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. १ मिनिट ४३ सेकंदाच्या या टीझरमध्ये भाईजान हटके लुकमध्ये पाहायला मिळतोय.

लांब केस, ब्लॅक लेदर जॅकेट आणि लकी चार्म ब्ल्यू ब्रेसलेट फ्लॉन्ट करणारा भाईजान आधी बाईकवर दिसतो आणि मग लुंगी नेसून डान्स करतानाही पाहायला मिळतो. यानंतर त्याचा ॲक्शन अवतारही दिसतो. पूजा हेगडेसोबतचे त्याचे रोमॅन्टिक सीन्सही दिसतात.

'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं...' बस याच डायलॉगवर टीझरमध्ये पूजा हेगडे सलमानवर फिदा होते. शहनाज गिल व पलक तिवारीची झलकही पाहायला मिळते. दोघीही साऊथच्या पारंपरिक लुकमध्ये दिसत आहेत. टीझरच्या शेवटी भाईजान जबरदस्त ॲक्शन करताना दिसतो. 'जब शरीर, दिल और दिमाग मुझसे कहते हैं, बस भाई, No More, तो मैं कहता हूं, Bring It On, Bring It On' या डायलॉगने टीझर संपतो.

आज जे लोक 'पठाण'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला गेलेत, त्यांनी सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर पाहिला आहे. अनेकांनी हा टीझर मोबाईलवर शूट केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर सकाळपासूनच ट्विटरवर #SalmanKhan आणि #KisiKaBhaiKisiKiJaan ट्रेंड करू लागला. यानंतर काही तासांनी युट्यूबरवर 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर रिलीज केला गेला. हा टीझर पाहून सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Web Title: Salman Khan Pooja Hegde Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Teaser Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.