लीक झाला ‘भारत’मधील सलमान खानचा लूक, मेकर्सनी घेतला धसका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 15:39 IST2018-10-31T15:38:35+5:302018-10-31T15:39:05+5:30

‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. याचपैकी सलमानचा एक लूक लीक होऊन इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

salman khan look from bharat viral and makers have taken this action | लीक झाला ‘भारत’मधील सलमान खानचा लूक, मेकर्सनी घेतला धसका!!

लीक झाला ‘भारत’मधील सलमान खानचा लूक, मेकर्सनी घेतला धसका!!

‘टायगर जिंदा है’ आणि ‘सुल्तान’सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सलमान खान व अली अब्बास जफर या जोडीचा ‘भारत’ हा चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटासाठी सध्या सलमान खान प्रचंड मेहनत घेतोय. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. याचपैकी सलमानचा एक लूक लीक होऊन इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. निश्चितपणे हा ‘भारत’च्या मेकर्ससाठी मोठा धक्का आहे आणि त्यामुळेच अशी चूक पुन्हा होता कामा नये, याचा पुरेपूर बंदोबस्त मेकर्सनी केला आहे.

होय, सलमानचा लूक लीक झाल्यानंतर यापुढे ‘भारत’च्या सेटवर मोबाईल फोन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय गेट पासशिवाय कुणालाही या सेटवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. भेटणाºयांनाही मनाई करण्यात आली आहे. एकंदर काय तर यापुढे कुठलीही रिस्क घ्यायला ‘भारत’चे मेकर्स तयार नाहीत, असेच दिसतेय. अर्थात त्याला कारणही तसेच ठोस आहे. होय, या चित्रपटात सलमान त्याच्या करिअरमधील सगळ्यात युनिक रोल साकारणार असल्याचा दावा केला जात आहे.

Web Title: salman khan look from bharat viral and makers have taken this action