ऐकले का? भाईजान सलमान खान घेऊन येतोय स्वत:चे चॅनल! ‘शिफ्ट’ होणार कपिल शर्मा शो !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 13:00 IST2019-03-17T12:26:07+5:302019-03-17T13:00:10+5:30

सलमानच्या डोक्यात एक नवा आणि मोठा प्लान आहे. होय, स्वत:चे टीव्ही चॅनल लॉन्च करण्याची तयारी सलमानने चालवली आहे.

salman khan launch tv channel and being children foundation | ऐकले का? भाईजान सलमान खान घेऊन येतोय स्वत:चे चॅनल! ‘शिफ्ट’ होणार कपिल शर्मा शो !!

ऐकले का? भाईजान सलमान खान घेऊन येतोय स्वत:चे चॅनल! ‘शिफ्ट’ होणार कपिल शर्मा शो !!

ठळक मुद्देसलमान खानने नुकतीच भारत सिनेमाची शूटिंग संपवली आहे. यानंतर तो आगामी सिनेमा ‘दबंग3’ च्या शूटिंगमध्ये बिझी होणार आहे, लवकरच सलमान या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे.

सलमान खान केवळ बॉलिवूडचा सुपरस्टार नाही तर  छोट्या पडद्यावरचाही सगळ्यात सक्रिय ‘सुपरस्टार’ आहे. मोठ्या पडद्यावर सलमानने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिलेत आणि छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस’सारखा सुपरहिट रिअ‍ॅलिटी शो होस्ट केला. आता सलमान टीव्ही शोचा निर्माताही बनला आहे. कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ सलमानने प्रोड्यूस केला आहे. पण आता सलमानच्या डोक्यात एक नवा आणि मोठा प्लान आहे. होय, स्वत:चे टीव्ही चॅनल लॉन्च करण्याची तयारी सलमानने चालवली आहे.
सूत्रांचे मानाल तर, स्वत:चे नवे टीव्ही चॅनल लॉन्च करण्याचा सलमानचा इरादा एकदम पक्का आहे. साहजिकच, चॅनल म्हटल्यानंतर त्याला ब-याच कंटेन्टची गरज भासणार आहे. अशात कपिल शर्माचा शो सलमानच्या नव्या चॅनलवर झळकण्याची शक्यता आहे. होय, सध्या सलमानचा ‘एस के टी व्ही’ हे प्रॉडक्शन हाऊस कपिल शर्माचा शो प्रोड्यूस करतोय.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही चॅनलचे लायसन्स मिळाले तर सलमान कपिल शर्मा शो आपल्या नव्या चॅनलवर शिफ्ट करू शकतो.

या स्वत:च्या टीव्ही चॅनलशिवाय ‘बीर्इंग ह्युमन’ या फाऊंडेशननंतर ‘बीर्इंग चिल्ड्रेन’ या नावाचे अन्य एक फाऊंडेशन उभारण्याचा निर्णयही भाईजानने घेतला आहे. मुलांचे शिक्षण आणि त्यांचे संगोपन यासाठी हे फाऊंडेशन काम करेल.

सलमान खानने नुकतेच ‘भारत’ सिनेमाचे शूटिंग संपवले आहे. यानंतर तो ‘दबंग3’ च्या शूटिंगमध्ये बिझी होणार आहे.   येत्या १ एप्रिलपासून ‘दबंग3’ चे शूटिंग सुरु होत आहे. यात   सोनाक्षी सिन्हा,बॉबी देओल,कन्नड स्टार किच्चा सुदीप अशी स्टारकास्ट आहे. प्रभूदेवा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. तर मलायका आणि अरबाज खानचा मुलगा अरहान प्रभूदेवाला असिस्ट करणार आहे.  

Web Title: salman khan launch tv channel and being children foundation