KKBKKJ : ईदच्या मुहुर्तावर भाईजानची जादू कायम, जाणून घ्या वीकेंड बॉक्सऑफिस कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 10:34 AM2023-04-24T10:34:30+5:302023-04-24T10:35:42+5:30

वीकेंडला झालेल्या शानदार बॉक्सऑफिस कलेक्शननंतर सलमान खानही खूश झाला.

salman khan latest movie kisi ka bhai kisi ki jaan box office collection crosses 50 cr | KKBKKJ : ईदच्या मुहुर्तावर भाईजानची जादू कायम, जाणून घ्या वीकेंड बॉक्सऑफिस कलेक्शन

KKBKKJ : ईदच्या मुहुर्तावर भाईजानची जादू कायम, जाणून घ्या वीकेंड बॉक्सऑफिस कलेक्शन

googlenewsNext

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) नुकत्याच रिलीज झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून आपला जलवा दाखवत आहे. ईदच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमाची पहिल्या दिवशीची कामगिरी निराशाजनक होती. मात्र वीकेंडला सिनेमाने वेग धरला आणि बॉक्सऑफिसवर कोटींची कमाई केली. वीकेंडला झालेल्या शानदार बॉक्सऑफिस कलेक्शननंतर सलमान खानही खूश झाला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले.

फरहाद सामजी दिग्दर्शित 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ १३ कोटी रुपयांची कमाई केली होती. सिनेमाची ओपनिंग खराब आहे हे पाहताच सिनेमात आपटणार का अशी शंका अनेकांना आली. मात्र २२ एप्रिल ईदनिमित्ताने सिनेमागृहात मोठी गर्दी उसळली. परिणामी फिल्मने दुसऱ्या दिवशी तब्बल २५ कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी रविवारी सिनेमाने 26.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. यासोबतच चित्रपटाची एकूण कमाई 64.25 कोटी रुपये इतकी झाली आहे. 

पार केला ५० कोटींचा आकडा

सलमान खानच्या या सिनेमाने तीनच दिवसात 50 कोटींचा आकडा पार केला आहे. याचाच अर्थ सलमानची जादू अजून कायम आहे. सिनेमात सलमान सोबत पूजा हेगडेची जोडी जमली आहे. तर व्यंकटेश, जगपति बाबू, विजेंदर सिंह, शहनाज गिल, पलक तिवारी, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम यांचीही मुख्य भूमिका आहे.

Web Title: salman khan latest movie kisi ka bhai kisi ki jaan box office collection crosses 50 cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.