हिंदी शिवाय 'या' भाषांमध्ये ही रिलीज होणार सलमान आणि कॅटरिनाचा 'भारत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:47 IST2019-02-13T13:35:49+5:302019-02-13T13:47:05+5:30
'टायगर जिंदा है' नंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भारत सिनेमात दिसणार आहे.

हिंदी शिवाय 'या' भाषांमध्ये ही रिलीज होणार सलमान आणि कॅटरिनाचा 'भारत'
ठळक मुद्देमुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये जुन्या दिल्लीचा सेट लावण्यात आला आहे. 'भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़
'टायगर जिंदा है' नंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना भारत सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये 'भारत' चर्चाचा विषय बनला आहे. गत जानेवारीमध्ये रिलीज झालेल्या टीझरला सुद्धा रसिकांची पसंती मिळाली आहे.
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सलमान खानचाभारत सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.
सध्या सिनेमाच्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग सुरु आहे, पुढच्या आठवड्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये जुन्या दिल्लीचा सेट लावण्यात आला आहे.
'भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़. यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़ म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़ प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल.