दीपिका पादुकोणनंतर डिप्रेशनचा बळी ठरली होती सलमान खानची ही अभिनेत्री, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 12:05 IST2020-04-16T11:38:12+5:302020-04-16T12:05:42+5:30

दीपिका पादुकोण ते बिपाशापर्यंत अनेक अभिनेत्री डिप्रेशनचा शिकार ठरल्या आहेत.

Salman khan heroine jacqueline fernandez was in depression gda | दीपिका पादुकोणनंतर डिप्रेशनचा बळी ठरली होती सलमान खानची ही अभिनेत्री, स्वत: केला खुलासा

दीपिका पादुकोणनंतर डिप्रेशनचा बळी ठरली होती सलमान खानची ही अभिनेत्री, स्वत: केला खुलासा

''चिट्टीयां कल्लाईयाँ'' वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बॉलिवूडमध्ये आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. पण खूप कमी लोकांना हे माहिती आहे की जॅकलिन कधी काळी डिप्रेशनमध्ये गेली होती. फिल्मी बिटच्या रिपोर्टनुसार जॅकलिनने मीडियाशी बोलताना याचा उलगडा केला. जॅकलिनने सांगितले थेरपीच्या मदतीने तिने तणावावर मात केला. दीर्घकाळ आयुष्यात एकटं राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.     


दीपिका पादुकोण ते बिपाशापर्यंत अनेक अभिनेत्री डिप्रेशनचा शिकार झाल्या होत्या. या यादीत आता जॅकलिनचे नावदेखील सामील झाले आहे.


जॅकलिनने मिस श्रीलंका हा किताब पटकावला होता. जॅकलिनचे वडील श्रीलंकन असून तिची आई मलेशियातील आहे. तिचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. ते म्हणजे तिचे आजी आजोबा गोव्याचे होते. जॅकलिनला इंग्रजी, हिंदीशिवाय फ्रेंच, स्पॅनिश आणि अरेबिक भाषादेखील येते. तिने सिडनीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.


जॅकलिनने 'अलादीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नुकताच जॅकलिनचा ड्राइव्ह हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत होते.ती आता कार्तिक आर्यनसोबत किरिक पार्टी या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

Web Title: Salman khan heroine jacqueline fernandez was in depression gda