सलमान खानने फक्त १ रुपया मानधन घेत 'या' सिनेमात केलेलं काम, भूमिकेसाठी संपूर्ण बॉलिवूडने दिलेला नकार; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:02 IST2025-12-27T13:45:44+5:302025-12-27T14:02:17+5:30
संपूर्ण बॉलिवूडने दिलेला नकार पण सलमानने स्विकारली ऑफर! साकारलेली HIV बाधित रुग्णाची भूमिका, तुम्ही बघितला का सिनेमा?

सलमान खानने फक्त १ रुपया मानधन घेत 'या' सिनेमात केलेलं काम, भूमिकेसाठी संपूर्ण बॉलिवूडने दिलेला नकार; कारण काय?
Salman Khan: भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, रुपेरी पडद्यावर आपल्या वैशिष्टपूर्ण अभिनय व नृत्य शैलीसाठी ओळखला जाणारा प्रभावशाली अभिनेता म्हणजे सलमान खान(Salman Khan). आज दि. २७ डिसेंबर रोजी अभिनेत्याचा जन्मदिवस आहे. सलमान खानने १९८८ मध्ये राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'बीवी हो तो ऐसी' मध्ये सहाय्यक भूमिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, सूरज बडजात्यांच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे त्याला यश मिळाले. त्यानंतर त्याने सनम बेवफा , साजन आणि कुर्बान सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. या चित्रपटांनी त्याला लव्हर बॉय म्हणून ओळखलं जाऊ लागलं.सलमान त्याच्या अभिनयासह दिलदारपणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो.
सलमानने आपल्या कारकिर्दीत अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत, ज्यामुळे त्याची आजही तितकीच चर्चा होते. परंतु, तुम्हाला माहितीये का अभिनेत्याचा एक चित्रपट अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्सनी नाकारला होता. मात्र, सलमानने मोठ्या मनाने ती भूमिका साकारण्यास होकार दिला. एड्स संदर्भात संपूर्ण तरुणामध्ये जागरुकता निर्माण करणं हा या चित्रपटाचा उद्देश होता. शिवाय त्यासाठी फक्त १ रुपया इतकं मानधन त्याने घेतलं होतं. या चित्रपटाचं नाव म्हणजे फिर मिलेंगे.या चित्रपटात एका एचआयव्ही बाधित रुग्णाची भूमिका साकारण्यास बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांनी नकार दिला होता.
'फिर मिलेंगे' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खानने एचआयव्ही बाधित रुग्णाची भूमिका साकारली होती.ही भूमिका साकारला कोणीही तयार होत नव्हतं,पण सलमानने ती भूमिका साकारली. सलमानसह चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि अभिषेक बच्चन यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटासाठी सलमाने फक्त १ रुपया इतकं मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं. फिर मिलेंगे' या सिनेमाचे दिग्दर्शक शेलैंद्र सिंग यांनी दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला होता.