Box Office Collection: भाईजानची जादू ओसरली अन् ‘दबंग 3’ आपटला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 03:46 PM2019-12-24T15:46:26+5:302019-12-24T15:47:51+5:30

तीन दिवस सलमानची जादू तुफान चालली. पण...

salman khan dabangg 3 day 4 Box Office Collection | Box Office Collection: भाईजानची जादू ओसरली अन् ‘दबंग 3’ आपटला...!

Box Office Collection: भाईजानची जादू ओसरली अन् ‘दबंग 3’ आपटला...!

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 24.50 कोटी कमावले.

भाईजान सलमान खानचादबंग 3’ हा सिनेमा गत 20 डिसेंबरला रिलीज झाला आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. भाईजानच्या चाहत्यांनी या सिनेमाची भरभरून प्रशंसा केली पण काहींनी मात्र हा सिनेमा पाहिल्यानंतर ‘भाई कब तक? असा सवाल केला. चांगले चित्रपट बनव. नाहीतर संन्यास घे’ अशा शब्दांत काहींनी सलमानला सुनावले. अर्थात याऊपरही डाय हार्ट चाहत्यांच्या जोरावर रिलीजनंतर तीन दिवसांत सलमानची जादू चालली. पण चौथ्या दिवशी मात्र ‘दबंग 3’च्या कमाईचा ग्राफ सरकन् खाली आला.
पहिल्या दिवशी 24.50 कोटी कमाई करणा-या या सिनेमात काल सोमवारी केवळ 10.70 कोटींची कमाई करत मेकर्सची निराशा केली.




  प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 24.50 कोटी कमावले. दुस-या दिवशी 24.75 कोटींची कमाई केली. रविवारी तिस-या दिवशी 31.90 कोटी कमावले. पण सोमवारी मात्र केवळ 10.70 कोटींचा बिझनेस केला. चित्रपटाची एकूण कमाई 91.85 कोटी असली तरी चित्रपटाची क्रेज कमी झाल्याचेच यावरून दिसतेय.


पहिल्या दिवशी या चित्रपटाने 24.50 कोटींची कमाई केल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावरच्या अनेक युजर्सनी हा आकडा खोटा असल्याचा आरोप केला होता.  केआरके अर्थात कमाल आर खान याने सर्वप्रथम या आकड्यावर आक्षेप घेतला होता. ‘हे फेक कलेक्शन आहे. माझ्याकडे फक्त दोनच शब्द आहेत, आ... थू... हे फेक कलेक्शनही चित्रपट फ्लॉप होण्यापासून वाचवू शकत नाहीत,’असे केआरकेने म्हटले होते. त्यानंतर अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया देणे सुरु केले होते.

   

Web Title: salman khan dabangg 3 day 4 Box Office Collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.