ऐश्वर्या-संगीतापूर्वी 'या' मुलीच्या प्रेमात होता सलमान; १९ वर्षानंतर दोघांची भेट झाली पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 02:56 PM2024-03-29T14:56:11+5:302024-03-29T14:56:45+5:30

Salman khan: १९ वर्षानंतर जेव्हा ती सलमानसमोर आली तेव्हा सलमान पुन्हा जुन्या काळात हरवून गेला होता. मात्र, तिचं एक सत्य समजल्यानंतर तो थक्क झाला.

salman-khan-could-not-proposed-to-his-crush-met-her-after-15-years-reveled | ऐश्वर्या-संगीतापूर्वी 'या' मुलीच्या प्रेमात होता सलमान; १९ वर्षानंतर दोघांची भेट झाली पण...

ऐश्वर्या-संगीतापूर्वी 'या' मुलीच्या प्रेमात होता सलमान; १९ वर्षानंतर दोघांची भेट झाली पण...

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman khan) याच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे कायम चर्चेत येत असतो. सलमानने वयाची पन्नाशी पार केली आहे. मात्र, आजही तो अविवाहित असल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगतांना दिसतात. यात त्याचं आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं नातं तर जगजाहीर आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी विभक्त झाली. मात्र, ऐश्वर्या सलमानचं पहिलं प्रेम नाही. तिच्यापूर्वी तो एका मुलीवर जीवापाड प्रेम करायचा मात्र, कधीच त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली नाही. 

सलमानचं नाव ऐश्वर्या राय प्रमाणेच संगीता बिजलानीसोबतही जोडलं गेलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मात्र,ऐनवेळी त्यांचं नात मोडलं. मात्र, संगीता किंवा ऐश्वर्या या सलमानचं पहिलं प्रेम नसून कॉलेजच्या जीवनात त्याचं एका मुलीवर प्रेम होतं. बिग बॉस १३ मध्ये सलमानने या गोष्टीचा खुलासा केला होता.

कोणावर होतं सलमानचं पहिलं प्रेम?

बिग बॉस १३ मध्ये काजोल आणि अजय त्यांच्या तान्हाजी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते.  त्यावेळी, सलमान तुला एखादी मुलगी आवडली पण त्याविषयी तिला सांगता आलं नाही, असं कधी झालंय का? असा प्रश्न काजोलने त्याला विचारला. त्यावर त्याने, त्याच्या पहिल्या प्रेमाविषयी खुलासा केला.

...म्हणून सलमानने दिली नाही प्रेमाची कबुली

"एक मुलगी होती जिला मी माझ्या मनातल्या भावना आणि प्रेमाबद्दल कधीच सांगितलं नाही. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. ती मला खूप आवडायची. पण, नकार मिळेल या भीतीने मी कधीच व्यक्त झालो नाही", असं सलमान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "माझे तीन मित्र होते ते कधी ना कधी त्या मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होते. माझंही तिच्यावर प्रेम होतं. पण, नकाराच्या भीतीमुळे मी माझ्या मनातली गोष्ट तिला सांगूच शकलो नाही. बराच काळ गेल्यावर मला कळलं की तिचंही माझ्यावर प्रेम होतं. त्यावेळाी मला फार वाईट वाटलं. पण खरा धक्का मला १९ वर्षानंतर बसला. कारण, ती मला भेटली त्यावेळी ती चक्क आजी झाली होती. त्यावेळी आपण आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत तेच बरं झालं असं तिच्याकडे पाहून वाटू लागलं."

दरम्यान, "तिला मोठी मोठी नातवंडं आहेत. आणि, ते माझे चाहते आहेत असं तिने सांगितलं. मुळात मला ती एवढ्या वर्षानंतर भेटली त्यामुळे मी तिला ओळखलं नाही. तू कोण आहेस असं मी विचारल्यावर तिने तिची ओळख करुन दिली. परंतु, माझ्या डोळ्यासमोर होती ती मुलगी १९ वर्षानंतर प्रचंड बदलली होती", असं म्हणत सलमानने त्याच्या पहिल्या प्रेमाचा किस्सा सांगितला.

Web Title: salman-khan-could-not-proposed-to-his-crush-met-her-after-15-years-reveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.