‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरसाठी ‘unlucky’ ठरू शकतो सलमान खान! हे आहेत पुरावे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 15:58 IST2017-11-30T10:28:39+5:302017-11-30T15:58:39+5:30
हरियाणाच्या मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड’चा ताज जिंकला आणि लगेच तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा सुरु झाल्यात. वर्षभर तरी मला बॉलिवूडमध्ये ...
.jpg)
‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरसाठी ‘unlucky’ ठरू शकतो सलमान खान! हे आहेत पुरावे!!
ह ियाणाच्या मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड’चा ताज जिंकला आणि लगेच तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा सुरु झाल्यात. वर्षभर तरी मला बॉलिवूडमध्ये जायचे नाही, असे मानुषीने स्पष्ट केले आहे. पण तरिही अनेकजण मानुषीला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सूक आहेत. यात सगळ्यांत वरचे नाव आहे ते सलमान खानचे. सलमान खान मानुषीला लॉन्च करू शकतो, अशी खबर आहे. खरे तर सलमानने अनेकांना लॉन्च केले आहे. अनेकांना संधी दिली आहे. पण सलमानबद्दल आणखी एक गोष्ट तितकीच सत्य आहे. ती म्हणजे, सलमान ज्यांना कुणाला लॉन्च करतो, त्याची नौका डुबते आणि डुबतेच. याची अनेक उदाहरणे आहेत. मग ती अभिनेत्री असो वा अभिनेते. सलमानने ज्यांना लॉन्च केले, त्यांचे करिअर फार काळ चालले नाही.
![]()
सोनाक्षी सिन्हा (दबंग), नगमा (बागी) आणि रवीना टंडन (पत्थर के फूल) हे अगदी तुरळक अपवाद वगळता सलमानसोबत बॉलिवूडमध्ये आलेल्या अभिनेत्री फार काळ तग धरू शकल्या नाहीत. भाग्यश्री (मैंने प्यार किया), चांदनी (सनम बेवफा), रेवती (लव) व भूमिका चावला (तेरे नाम) या सगळ्यांचे नाव यात घेता येईल. या सगळ्याजणी ‘वन टाईम वंडर’ बनूनच राहिल्या. त्या सलमानसोबत दिसल्या, चित्रपटही सुपरहिट झाला आणि मग अचानक आल्या तशाच अचानक गायब झाल्यात.
ALSO READ : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या खोलीत का यायची प्रत्येक सौंदर्यवती? काय होता हेतू?
यापश्चातही सलमानने अनेकींना संधी दिली. पण आज या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये एकदर संघर्ष करत आहेत किंवा मग लहान-मोठ्या भूमिकांवर त्यांना समाधान मानावे लागत आहे. कॅटरिना कैफसारखी दिसणारी जरीन खान याचे ताजे उदाहरण आहे. याशिवाय ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसणारी स्रेहा उल्लाल हेही एक उदाहरण आहे. ‘बॉडीगार्ड’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी हेजल किचही युवराज सिंगसोबत लग्न करून संसारात रमली आहे. तर डेजी शाह ही सुद्धा कामाच्या शोधात आहे. आता इतकी उदाहरणे असताना मानुषी छिल्लर सलमानसोबत लॉन्च होणार असेल तर तिच्या फिल्मी करिअरवर नजर ठेवणे निश्चितच इंटरेस्टिंग ठरेल.