सलमान खानने चिमुकल्या फॅनसाठी लगावली बॉडीगार्डच्या कानशिलात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 07:07 PM2019-06-05T19:07:20+5:302019-06-05T19:10:19+5:30

सलमान खानच्या भारत या चित्रपटाचे प्रिमियर काल धुमधडाक्यात पार पडले. या प्रिमियरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

Salman Khan comes to kid's rescue, slaps own bodyguard during 'Bharat' screening | सलमान खानने चिमुकल्या फॅनसाठी लगावली बॉडीगार्डच्या कानशिलात?

सलमान खानने चिमुकल्या फॅनसाठी लगावली बॉडीगार्डच्या कानशिलात?

googlenewsNext
ठळक मुद्देएक लहान मुलगा सलमान खानला भेटण्यासाठी पुढे येत होता. पण लोकांना मागे ढकलले जात असल्याने त्याला इतर लोकांचा धक्का लागला आणि त्याचा तोल गेला. हा प्रकार सलमानला दिसताच त्याने लहान मुलासोबत वाईट वागल्याबद्दल बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली. 

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमान खानचा भारत हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रेक्षकांनी देखील पहिल्याच दिवशी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील हिट होईल अशी सलमानच्या फॅन्सना खात्री आहे.

सलमान खानच्या भारत या चित्रपटाचे प्रिमियर काल धुमधडाक्यात पार पडले. या प्रिमियरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सलमान देखील या प्रिमियरला उपस्थित होता. सलमान प्रिमियरला येणार आहे हे कळताच त्याच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाभोवती प्रचंड गर्दी केली होती. लहान मुलांपासून वयस्क लोकांपर्यंत सगळेच सलमानची एक झलक पाहाण्यासाठी चित्रपटगृहाच्या बाहेर उभे होते. 

सलमानला पाहाता यावे, त्याच्यासोबत फोटो काढता यावा अशी सलमानच्या चाहत्यांची इच्छा होती. प्रिमियर संपल्यानंतर सलमान आपल्या गाडीत बसण्यासाठी निघाला होता. त्यावेळी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले बॉडीगार्ड लोकांना दूर करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळात एक लहान मुलगा सलमान खानला भेटण्यासाठी पुढे येत होता. पण लोकांना मागे ढकलले जात असल्याने त्याला इतर लोकांचा धक्का लागला आणि त्याचा तोल गेला. हा प्रकार सलमानला दिसताच त्याने लहान मुलासोबत वाईट वागल्याबद्दल बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली असे वृत्त टाईम्स नाऊने दिले आहे.

पीपींगमूनने या प्रसंगाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला आहे. त्यांनी त्यासोबत पोस्ट लिहिली आहे की, फिनिक्स मॉलमधील पीव्हीआरमध्ये भारत या चित्रपटाचा प्रिमियर काल होता. यावेळी एक छोटासा मुलगा सलमान खानला पाहाण्यासाठी उभा होता. पण बॉडीगार्डने लोकांना दूर करण्याचा प्रयत्न केला असता त्याला धक्का लागला. सलमानला लहान मुले प्रचंड आवडतात. त्यामुळे हा प्रकार पाहून सलमान प्रचंड चिडला आणि लहान मुलासोबत बॉडीगार्डने वाईट वागल्यामुळे त्याने त्या बॉडीगार्डच्या कानाखाली वाजवली. 

भारत या चित्रपटात सलमान खानसोबतच कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर, दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 
 

Web Title: Salman Khan comes to kid's rescue, slaps own bodyguard during 'Bharat' screening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.