चॅलेंज! फोटोतील या क्यूट मुलाला ओळखलं का? आज बनला आहे बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 17:19 IST2022-01-22T17:17:14+5:302022-01-22T17:19:10+5:30
एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक क्यूट लहान मुलगा दिसत आहे. आज हा लहान मुलगा हॅंडसम हंक बनला आहे. तुम्ही ओळखलं का कोण आहे हा लहान मुलगा?

चॅलेंज! फोटोतील या क्यूट मुलाला ओळखलं का? आज बनला आहे बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार
सोशल मीडियावर नेहमीच बॉलिवूड कलाकारांचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. फॅन्सना त्यांचे लाडके बॉलिवूड कलाकार बालपणी कसे दिसत होते, हे बघणं आवडतं. अशातच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक क्यूट लहान मुलगा दिसत आहे. आज हा लहान मुलगा हॅंडसम हंक बनला आहे. तुम्ही ओळखलं का कोण आहे हा लहान मुलगा?
फोटोत दिसत असलेला हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नाही तर बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) आहे. बालपणी सलमान खान असा दिसत होता. फोटोत तुम्ही बघू शकता की, सलमान खान शर्टलेस आहे आणि कॅमेरासमोर उभा राहून पोज देत आहे. या फोटोवर फॅन्सकडून लाईक्सचा पाऊस पाडला जात आहे.
फोटो बघून हेही लक्षात येतं की, सलमान खानला बालपणापासूनच शर्टलेस होण्याची आवड होती. सलमान खानने त्याच्या अनेक सिनेमात शर्ट काढून आपली बॉडी दाखवली आहे. ५६ वयाचा झाला असूनही सलमान खान आजही फीट आहे. त्यासाठी तो अनेक तास जिममध्ये वर्कआउट करतो.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर सलमान खान 'अंतिम' या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याने एका शीख पोलिसाची भूमिका साकारली होती. यात तो पहिल्यांदा बहीण अर्पिताचा पती आयुष शर्मासोबत दिसला होता. तर महेश मांजरेकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं
सलमान खान सध्या अनेक सिनेमांवर काम करत आहे. तो आगामी 'टायगर ३', 'किक २' आणि 'कभी ईद कभ दिवाली' या सिनेमांमध्ये दिसणार आहे. तसेच त्याने काही दिवसांपूर्वीच 'बजरंगी भाईजान 2' सिनेमाचीही घोषणा केली. तसेच तो शाहरूख खानच्या 'पठाण' सिनेमात कॅमिओ करणार आहे.
हे पण वाचा :
जगातील कोणतीही व्यक्ती आशिया ते दक्षिण अमेरिका विमान प्रवास करू शकत नाही, पण का?