कॅटरिना नाही तर दिशासाठी पहिल्यांदा सलमानने तोडला त्याचा अनेक वर्षांचा नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 11:44 IST2019-04-26T11:37:41+5:302019-04-26T11:44:22+5:30
अभिनेता सलमान खान नो किसिंग क्लॉज तर संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे. सलमान खान सिनेमात अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन आणि किसिंग सीन कधी देत नाही.

कॅटरिना नाही तर दिशासाठी पहिल्यांदा सलमानने तोडला त्याचा अनेक वर्षांचा नियम
अभिनेता सलमान खान नो किसिंग क्लॉज तर संपूर्ण इंडस्ट्रीला माहिती आहे. सलमान खान सिनेमात अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन आणि किसिंग सीन कधी देत नाही. मात्र इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा सलमानने हा क्लॉज तोडलाय असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसले का ?हो पण असे झालंय. सलमानने हा क्लॉज दिशा पाटनीसाठी तोडला आहे.
दिशा सलमानसोबत 'भारत'मध्ये काम करतेय. काही दिवसांपूर्वीच भारताचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो रसिकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यानंतर सिनेमातले स्लो मोशन गाणंदेखील रिलीज झाले. जे सलमान आणि दिशावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात सलमान आणि दिशाची हॉट केमिस्ट्री दिसतेय.
स्लो मोशन गाणं जर तुम्ही नीट बघितलात तर यात एका सीनमध्ये दिशा सलमानला किस करताना दिसतेय. आता भलेही दिशाने सलमानला किस केले असेल तरी सलमानचा नो किसिंग क्लॉज यामुळे तुटलाच ना.
भारतमध्ये सलमान खान, दिशासह कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर आणि तब्बू अशी कलाकारांची तगडी फौज आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अली अब्बास जाफरने सांभाळली आहे. ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भारत सिनेमात अॅक्शन, रोमान्स आणि देशभक्ती पाहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात या सिनेमाची कथा उलगडण्यात येणार आहे.