सलमान खान बर्थडे स्पेशल : बॉलिवूडमध्ये ‘सुल्तान’ची ‘दबंग’ गिरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 15:07 IST2016-12-27T13:34:06+5:302016-12-27T15:07:35+5:30
बॉलिवूडचा सुपरस्टार, दबंगस्टार, मेगास्टार, ट्रेंड सेटर, चॉकलेट बॉय सलमान खान याचा आज ५१ वा वाढदिवस. काल रात्री १२ वाजता ...

सलमान खान बर्थडे स्पेशल : बॉलिवूडमध्ये ‘सुल्तान’ची ‘दबंग’ गिरी!
ब लिवूडचा सुपरस्टार, दबंगस्टार, मेगास्टार, ट्रेंड सेटर, चॉकलेट बॉय सलमान खान याचा आज ५१ वा वाढदिवस. काल रात्री १२ वाजता पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर त्याचा लाडका भाच्चा अहिलसह मित्रमंडळ, आप्तस्वकीय, ‘बी टाऊन’चे अनेक सितारे बर्थडे बॅशला उपस्थित होते. फार्महाऊसवर अॅरेंज करण्यात आलेल्या पार्टीत जल्लोष, धम्माल, मस्तीसह बिग चॉकलेट के क कटिंग करण्यात आले. चाहत्यांनी सोशल मीडियावरही आपल्या लाडक्या सल्लूमियाँला शूभेच्छा दिल्या. १९८८ च्या ‘बिवी हो तो ऐसी’ मधून त्याने बॉलिवूडमधील प्रवासाला सुरूवात केली. ‘मैंने प्यार किया’ नंतर तो प्रेक्षकांचा चाहता बनला. अभिनयासोबतच त्याच्या लुक्सचे अनेक दिवाने आहेत. अभिनयाची ‘दबंगगिरी’ करत त्याने बॉलिवूडमध्ये अनेक ‘ट्रेंड’ सेट केले. त्याच्या ५१ व्या वाढदिवसाबद्दल सीएनएक्स टीमकडून हार्दिक शुभेच्छा... पाहूयात, त्याचे बॉलिवूडमधील १० आॅनस्क्रीन लुक्स :
![]()
* चॉकलेट बॉय इमेज :
बॉलिवूडमध्ये सलमान खानने ‘बिवी हो तो ऐसी’ मधून डेब्यू केला. पण, तो खऱ्या अर्थाने नावारूपास आला तो ‘मैने प्यार किया’ पासून. त्याच्या चॉकलेट बॉयच्या इमेजने भल्याभल्यांना भूरळ घातली. त्यावेळच्या अभिनेत्रीच काय पण, हिरो, दिग्दर्शकही त्याच्या तारखा मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. क्लासिक लव्हस्टोरीज आणि किंचित लांब केस, लेदर जॅकेट आणि बुलेटवरील कमांड यांमुळे तो तरूणींच्या हृदयाचा ठोका चुकवायचा.
![]()
* शर्टलेस सल्लूमियाँ :
९०च्या दशकात गाणं सुरू असताना शर्ट काढून डान्स करणं हे भाईजानने टाकलेलं आव्हानात्मक पाऊल होतं. ‘प्यार किया तो डरना क्याँ’ मधील ‘ओ ओ जाने जाना’ हे गाणं आठवतंय ना? त्यात कानाला माईक लावून स्टेजवर शर्टलेस डान्स करणारा हॉट सलमान प्रेक्षकांना प्रचंड भावला. सर्वसाधारण कॉलेजबॉयची इमेज असणारा हेअरस्टाईल लुक यात त्याने साकारला. या चित्रपटापासून तो केवळ एक हिरो नव्हे तर शर्टलेस इमेजचा ट्रेंड सेटरही ठरला.
![]()
* सभ्य आणि निरागस ‘प्रेम’ :
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित हिच्यासह सलमानने ‘हम आपके हैं कौन?’ चित्रपट साकारला. यात त्याने साकारलेल्या ‘प्रेम’ च्या भूमिकेला चाहत्यांनी प्रचंड लाईक केलं. ‘हम आपके हैं कौन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. यात प्रेमची असलेली हेअरस्टाईल त्यावेळच्या कॉलेजवयीन मुलांची हेअरस्टाईल बनली.
![]()
* हेअरस्टाईलही ‘तेरे नाम’ :
२००३ मध्ये सलमान खान आणि भूमिका चावला यांच्या मुख्य भूमिकेतील ‘तेरे नाम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून अनेक कॉलेजवयीन तरूणांनी संपूर्ण टक्कल करून त्यावर घाव घातल्याप्रमाणे असलेले व्रण अशी हेअरस्टाईल केली. ‘राधे’ च्या या हेअरस्टाईलने ‘बी टाऊन’च्या कलाकारांनाही भूरळ घातली.
![]()
* ‘मिल्ट्री मॅन’ सारखा हँण्डसम लूक :
अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, सलमान खान यांच्या मुख्य भूमिकेतील परफेक्ट रॉमकॉम ‘मुझसे शादी करोगे’ प्रदर्शित झाल्यावर सलमानचा ‘मिल्ट्री मॅन’ सारखा लुक पाहिल्यावर त्याच्यावर चाहते फिदा झाले. त्यातील त्याच्या ‘अँग्री यंग मॅन’ लुक वर चाहत्यांनी प्रेम केलं.
![]()
* ‘दबंग’ पडला भारी :
२०१० मध्ये ‘दबंग’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलमान खान बॉलिवूडचा ‘दबंग’ बनला. सोनाक्षी सिन्हा सोबतची त्याची केमिस्ट्री लक्षवेधी ठरली. ‘चुलबुल पांडे’ या पोलिस इन्स्पेक्टरची त्याने साकारलेल्या भूमिकेने संपूर्ण पोलिसवर्गाबद्दल अभिमान व्यक्त करायला चाहत्यांना भाग पाडले. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका त्याने साकारल्याने चाहत्यांनी त्याची पाठ थोपटली. साधारण केस आणि गॉगल युनिफॉर्मवर अडकवण्याची कला चाहत्यांना प्रचंड आवडली.
![]()
* हेअरस्टाईलमध्येही ‘वीर’:
ऐतिहासिक कथानकावर आधारित ‘वीर’ चित्रपटात सलमान खानने केलेली भूमिका चाहत्यांना आवडली. जरीन खानसोबतच्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फार काही कमाई केली नाही पण, त्याच्या हेअरस्टाईलने मात्र अनेकांची मने जिंकली. मोठ्या साईजमधील त्याचे केस कलरफुल आणि सिल्की करण्यात आले होते. चित्रपटातील त्याची जरीनसोबतची केमिस्ट्री चाहत्यांनी पसंत केली.