रितेशचा 'भाई'चारा! सलमानच्या वाढदिवशी लिहिली 'वेड' लावणारी पोस्ट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 12:54 IST2023-12-27T12:54:15+5:302023-12-27T12:54:48+5:30

Salman Khan Birthday : भाईजानचा आज ५८वा वाढदिवस आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही सलमानला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

salman khan birthday riteish deshmukh shared special post for bhaijan goes viral | रितेशचा 'भाई'चारा! सलमानच्या वाढदिवशी लिहिली 'वेड' लावणारी पोस्ट, म्हणाला...

रितेशचा 'भाई'चारा! सलमानच्या वाढदिवशी लिहिली 'वेड' लावणारी पोस्ट, म्हणाला...

बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख मिळवलेल्या सलमान खानचा आज ५८वा वाढदिवस आहे. सिनेमांमधून अभिनयाची 'दबंग'गिरी करत भाईजानने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्याचे लाखो चाहते आहेत. भाईजानच्या स्टाइलची चाहत्यांना भुरळ पडते. आज त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही सलमानला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन जिनिलिया, सलमान आणि त्याचा एक फोटो शेअर करत भाईजानसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट शेअर करत रितेशने सलमानला खास शुभेच्छा दिल्या आहेत. "भाऊ...ज्याच्यावर मी प्रेम करतो. तुझं आयुष्य प्रेम, आनंद आणि हास्याने भरलेलं असावं. आज तुझ्या वाढदिवशी आणि इतरही दिवशी मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो," असं रितेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर सलमानच्या चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

सलमान आणि रितेश एकमेकांचे चांगले मित्र आहेत. रितेशच्या 'वेड' सिनेमातही सलमानने कॅमिओ केला होता. या सिनेमातील 'मला वेड लावलंय' या गाण्यात तो दिसला होता. दरम्यान, सलमानचा 'टायगर ३' दिवाळीच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. परंतु, या सिनेमाला प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 

Web Title: salman khan birthday riteish deshmukh shared special post for bhaijan goes viral