​ सलमान होणार ‘जवाहिरी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 18:17 IST2016-07-28T12:47:56+5:302016-07-28T18:17:56+5:30

हो, तुम्ही वाचताय ते बरोबरच आहे. पण, सलमान खान कुठल्या चित्रपटात ‘जवाहिरी’ची भूमिका साकारत नाहीये तर तो खरोखरच दागिन्यांच्या ...

Salman Khan to be 'Zawahiri' | ​ सलमान होणार ‘जवाहिरी’

​ सलमान होणार ‘जवाहिरी’

, तुम्ही वाचताय ते बरोबरच आहे. पण, सलमान खान कुठल्या चित्रपटात ‘जवाहिरी’ची भूमिका साकारत नाहीये तर तो खरोखरच दागिन्यांच्या व्यवसायात उतरतोय. आता तुम्ही म्हणाल, सलमानचा नि दागिन्यांचा काय संबंध? तो तसा नसेलही. परंतु सलमानकडे ‘पारखी नजर’ आहे, हे कुणी कसे नाकारू शकेल. तसे नसते तर स्रेहा उलाल, जरीन खान, डेझी शाह आज बॉलिवूडमध्ये असत्या का? हीच पारखी नजर तो आता दागिन्यांच्या व्यवसायात वापरणार आहे. सलमानची संस्था ‘बीर्इंग ह्यूमन’च्या अंतर्गत तो हा व्यवसाय करणार आहे. विशेष म्हणजे, तो या संस्थेमार्फत जे दागिने बाजारात आणतोय ते महिला आणि पुरुष दोघांसाठीही आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये ही ज्वेलरी ग्राहकांना प्रत्यक्ष खरेदी करता येईल. याबाबत सलमानची बहीण अर्पिता खान  हिने सविस्तर महिती दिली. या व्यवसायातून मिळणारा नफा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगात आणला जाणार आहे. वेल, सलमान तुझ्या या चांगल्या उपक्रमासाठी तुला शुभेच्छा. पण, दागिन्यांचे असे अख्खे दुकान मालकीचे असताना ते मढवता येईल, असे कुणीतरी आपल्याही जवळ असावे, असे तुला वाटत नाही का हेही सांग जरा कधीतरी..

Web Title: Salman Khan to be 'Zawahiri'