सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सोशल मीडियावर पोस्ट करत केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:30 PM2024-03-12T14:30:43+5:302024-03-12T14:32:50+5:30

सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Salman Khan announces his new project with AR Muragadoss posted on social media | सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सोशल मीडियावर पोस्ट करत केली मोठी घोषणा

सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सोशल मीडियावर पोस्ट करत केली मोठी घोषणा

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अभिनेता सलमान खान नेहमीच चर्चेत असतो.  सलमान खानची फॅन फॉलोइंग आणि स्टारडम जबरदस्त आहे. चाहतेदेखील त्याच्यासाठी खूप वेडे आहेत. आता सलमानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खुद्द सलमान खानने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

सलमान खान लवकरच एका दमदार सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तो सिनेमा कोणता असेल याचा खुलासा सलमानने केलेला नसला तरी तो 'किक २' असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमासाठी आमिर खानच्या 'गजनी' या ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या ए.आर. मुरुगदास यांच्याशी सलमानने हातमिळवणी केली आहे. तर या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे देखील सलमानने सांगितले आहे. हा सिनेमा 2025 च्या ईदला रिलीज होणार आहे.

यापुर्वी साजिदने सलमानसोबत 'किक' चित्रपटात काम केलं होतं. 'किक' चित्रपटाचे दिग्दर्शन साजिद नाडियादवाला यांनी केले होते.  'किक 2' ची कमान साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास सांभाळत आहेत. सलमान खानने निर्माता साजिद नाडियादवालासोबत हातमिळवणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरे तर त्यांच्या जोडीने 'जुडवा', 'मुझसे शादी करोगी', 'किक' आणि असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ए.आर. मुरुगादासबद्दल सांगायचे तर ते 'गजनी', 'हॉलिडे: ए सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी' अशा अनेक हिट चित्रपटांसाठी ओळखले जातात. आता हे त्रिकूट एकत्र धमाल करायला तयार आहे.
 
सलमान खानला त्याच्या पुढच्या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्याचा 'पठाण'मधील कॅमिओही तुफान गाजलेला.  तो लवकरच विष्णुवर्धनच्या 'द बुल'मध्ये दिसणार आहे.
 

Web Title: Salman Khan announces his new project with AR Muragadoss posted on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.