सलमान खान आणि करण जोहरचा 'द बुल' सिनेमा लांबणीवर; जाणून घ्या काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 03:45 PM2024-02-15T15:45:38+5:302024-02-15T16:00:33+5:30

'द बुल'बाबत आता एक मोठं अपडेट समोर आलं आहे. 

Salman Khan and Karan Johar's 'The Bull' delayed over financial discussions | सलमान खान आणि करण जोहरचा 'द बुल' सिनेमा लांबणीवर; जाणून घ्या काय आहे कारण?

सलमान खान आणि करण जोहरचा 'द बुल' सिनेमा लांबणीवर; जाणून घ्या काय आहे कारण?

अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक करण जोहर मोठ्या पडद्यावर परतणार आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  त्यामुळे सलमान 'द बुल' सिनेमाच्या तयारीत असल्याचं दिसून आलं होतं. पण, आता पुन्हा एक मोठं अपडेट समोर आलं आहे. 

बॉलिवूड हंगामानुसार, 'द बुल' सिनेमाची अधिकृत घोषणा आणि शुटिंग दोन्ही रखडलं आहे. याचे कारण सलमान खानची फी असल्याचा दावा केला जात आहे. सलमान खान आणि करण जोहर यांच्यात चित्रपटाच्या बजेटबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यास विलंब होत आहे. सलमान खानला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे. पण हा चित्रपट फ्लोरवर नेण्यासाठी खूप खर्च करावा लागणार आहे. 

 'द बुल' हा एक महागडा चित्रपट आहे. करणने सलमान खानकडे त्याची फी आणि चित्रपटाचे बजेट फायनल करण्यासाठी काही वेळ मागितला आहे. सिनेमाबाबत दोघांमध्ये झालेला करार कागदावर येताच करण जोहर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार आहे. सलमान खान स्टारर 'द बुल' च्या दिग्दर्शनाची जबाबदारी विष्णू वर्धन घेत आहेत, त्यांनी याआधी 'शेरशाह' दिग्दर्शित केला आहे.

करण जोहरच्या 'द बुल' या सिनेमात सलमान खान पैरामिलिट्री ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सलमान आणि करण जोहर तब्बल 25 वर्षांनी एकत्र काम करतील. सलमानने करणच्या 1998 मध्ये आलेल्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमात काम केलं होतं. सलमानच्या आगामी सिनेमांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. लाडक्या भाईजानच्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Salman Khan and Karan Johar's 'The Bull' delayed over financial discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.