​आयुष शर्माच्या लॉन्चसाठी सलमान खान अन् करण जोहरची धडपड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2017 12:05 IST2017-05-01T06:35:34+5:302017-05-01T12:05:34+5:30

सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कधीपासून उतावीळ झाला आहे. खरे तर सलमान ...

Salman Khan and Karan Johar struggle for launch of Ayush Sharma | ​आयुष शर्माच्या लॉन्चसाठी सलमान खान अन् करण जोहरची धडपड!

​आयुष शर्माच्या लॉन्चसाठी सलमान खान अन् करण जोहरची धडपड!

मान खानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कधीपासून उतावीळ झाला आहे. खरे तर सलमान खान आपल्या जावयाला लॉन्च करणार, अशी कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण अद्यापही आयुषच्या लॉन्चचा मुहूर्त सापडलेला नाही. आयुषच्या लॉन्चिंगसाठी सलमान काहीच करत नाही, म्हटल्यावर बहीण अर्पिता नाराज तर होणारच. मध्यंतरी अर्पिता याच कारणावरून सलमानवर नाराज असल्याची खबर होती. लाडक्या बहीणीची नाराजी सलमान कशी सहन करणार? कदाचित त्याचमुळे आयुषच्या लॉन्चिंगची जोरदार तयारी सुरु झाली आहे. होय, काल-परवा आयुष करण जोहरच्या आॅफिसबाहेर दिसून आला. मग काय, सलमान सोडून करण जोहर आयुषला लॉन्च करणार का? याचीच चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. पण आता एक वेगळीच बातमी आहे. होय, आयुषला करण जोहर लॉन्च करणार नाहीयं. तर करण जोहर आणि सलमान दोघेही आयुषला लॉन्च करणार आहेत. आयुषसाठी एक सोलो फिल्म प्लान केली गेली आहे. येत्या जुलैपासून या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरु होणे अपेक्षित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून करण जोहर, आयुष आणि सलमान यांची चर्चा झाली. त्यामुळे आयुषचे ग्रॅण्ड लॉन्चिंग होणार, हे पक्के आहे.

ALSO READ : अर्पिता भडकली; म्हणाली, कुत्तो की तरह भौंकना छोडो

आयुष तर आपल्या लॉन्चिंगसाठी कित्येकदिवसांपासून कामाला लागला आहे. परफेक्ट बॉडी शेपपासून तर अ‍ॅक्टिंगमधील बारकावे शिकण्यापर्यंतची तयारी त्याने सुरु केली आहे.  सलमानच्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर आयुषची हजेरी त्याचाच एक भाग आहे. आता सलमान सारखा साळा असेल, त्याचे मार्गदर्शन असेल आणि तोच गॉडफादर असेल तर आयुषचे भाग्य फळफळले म्हणून समजा. आता केवळ प्रतीक्षा आहे, ती आयुषच्या चित्रपटाच्या आॅफिशिअल घोषणेची.

Web Title: Salman Khan and Karan Johar struggle for launch of Ayush Sharma