सलमान खान- ऐश्वर्या रायचा 'हा' सिनेमा फेव्हरेट आहे अभिषेक बच्चनचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 12:21 IST2018-10-23T11:15:01+5:302018-10-23T12:21:22+5:30

या शोदरम्यान अभिषेकने मुलगी आराध्याशी संबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या. आराध्याने पहिल्यांदाच ऐश्वर्याचा 'फन्ने खां' सिनेमा पाहिला.

Salman Khan- Aishwarya Rai's 'this' is a movie favored by Abhishek Bachchan | सलमान खान- ऐश्वर्या रायचा 'हा' सिनेमा फेव्हरेट आहे अभिषेक बच्चनचा

सलमान खान- ऐश्वर्या रायचा 'हा' सिनेमा फेव्हरेट आहे अभिषेक बच्चनचा

ठळक मुद्दे ऐश्वर्या आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत

संजय लीला भन्साळी यांनी बॉलिवूडला 'हम दिल दे चुके सनम'सारखा सुपरहिट सिनेमा दिला आहे. या सिनेमातील गाणी, कलाकारांच्या भूमिका आणि सलमान खान- ऐश्वर्या रायची केमिस्ट्री लोकांच्या आजही लक्षात आहे. हा सिनेमा फक्त प्रेक्षकांनाचा नाही तर ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चनाचा देखील आवडता सिनेमा आहे.   

नुकत्याच एका चॅट शो दरम्यान अभिषेक बच्चनने हे कबुल केले की ऐश्वर्याने काम केलेल्या सिनेमांपैकी त्याचा आवडता सिनेमा 'हम दिल दे चुके सनम' आहे. ऐवढेच नाही तर त्यांना सांगितले की हा सिनेमा त्यांने अनेकवेळा बघितला आहे. 'हम दिल दे चुके सनम'सह जोधा-अकबर, गुरु आणि रेनकोट हे सिनेमासुद्धा त्याला तिचे आवडतात.

या शोदरम्यान अभिषेकने मुलगी आराध्याशी संबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या. आराध्याने पहिल्यांदाच ऐश्वर्याचा 'फन्ने खां' सिनेमा पाहिला. या आधी आराध्याने एकही सिनेमा बघितला नव्हता. दोघे अनेक वर्षानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'गुलाब जामून' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या निमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या 'गुलाब जामून' सिनेमात अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी पाहायला मिळणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. सर्वेश मेवाडा हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.    
 

Web Title: Salman Khan- Aishwarya Rai's 'this' is a movie favored by Abhishek Bachchan