सलमानची हिरोईन डेजी शाहचे मालदीव्समधील बिकिनी फोटो व्हायरल, ओळखणंही झालंय कठिण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 01:11 PM2020-12-09T13:11:19+5:302020-12-09T13:12:31+5:30

डेजी शाह बीचवर बिकिनी घालून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. बऱ्याच दिवसांनी तिचा हा बोल्ड अंदाज बघायला मिळाल्याने तिचे फॅन्स आनंदी आहेत.

Salman Khan actress Daisy Shah enjoying in Maldives bikini photos viral on internet | सलमानची हिरोईन डेजी शाहचे मालदीव्समधील बिकिनी फोटो व्हायरल, ओळखणंही झालंय कठिण...

सलमानची हिरोईन डेजी शाहचे मालदीव्समधील बिकिनी फोटो व्हायरल, ओळखणंही झालंय कठिण...

googlenewsNext

सलमान खानसोबत 'जय हो' सिनेमात दिसणारी अभिनेत्री डेजी शाह सध्या मालदीव्समध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे.  डेजी शाह तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. नुकतेच तिने मालदीव्समधील खास फोटो इन्स्टावर शेअर केले असून तिला ओळखणंही कठिण झालं आहे. ती बीचवर बिकिनी घालून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. बऱ्याच दिवसांनी तिचा हा बोल्ड अंदाज बघायला मिळाल्याने तिचे फॅन्स आनंदी आहेत.

या फोटोंमध्ये डेजी शाह ब्लॅक कलरच्या लायनिंग बिकिनी घातलेली दिसते आहे. अभिनेत्रीने हे फोटो शेअर करत लिहिले की, 'जादूवर विश्वास ठेवा'. डेजी शाहच्या या फोटोंवर तिचे फॅन्स भरभरून कमेंटस् करत आहेत. डेजीने जी कमेंट केली आहे ते ती तिच्या बदलेल्या लूक आणि फिगरबाबत असेल असा अंदाज फॅन्स लावत आहेत.

तर दुसऱ्या काही फोटोंमध्ये डेजी शाह व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये बोट हाऊसवर बसलेली दिसते आहे. डेजी शाह सध्या सिनेमात दिसत नसली तरी सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असते आणि व्हिडीओ-फोटो शेअर करत असते. डेजी 'जय हो'नंतर 'हेट स्टोरी ३' आणि 'रेस ३' मध्येही दिसली होती. यासोबतच ती तिच्या डान्ससाठीही ओळखली जाते. ती तिचे डान्स व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
 

Web Title: Salman Khan actress Daisy Shah enjoying in Maldives bikini photos viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.