Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 09:35 IST2025-12-27T09:32:19+5:302025-12-27T09:35:03+5:30
आज सलमान खानचा ६० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मध्यरात्री सलमान खानने खास सेलिब्रेशन केलं

Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानने आपला ६० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानच्या वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन पनवेल येथील त्याच्या 'अर्पिता फार्म्स' या फार्महाऊसवर पार पडले. या खास प्रसंगी सलमानचा साधेपणा आणि कुटुंबाप्रती असलेले त्याचे प्रेम पुन्हा एकदा चाहत्यांच्या नजरेस पडले.
वाढदिवसाच्या मध्यरात्री सलमानने फार्महाऊसबाहेर जमलेल्या पापाराझींची भेट घेऊन त्यांच्यासोबत केक कापला. लाल आणि पांढऱ्या रंगाचा हा केक कापताना तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांना सलमानने स्वतःच्या हाताने केक भरवला. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी त्याच्या या कृत्याचे कौतुक केले आहे.
यानंतर फार्महाऊसच्या आत कौटुंबिक सोहळा पार पडला. या सेलिब्रेशनचा सर्वात खास क्षण म्हणजे सलमानने आपले वडील सलीम खान यांचा हात धरून सलमानने केक कापला. बाप-लेकामध्ये किती प्रेमळ नातं आहे, हे यावेळी पाहायला मिळाले. यावेळी सलमानचा भाऊ सोहेल खान, आयुष शर्मा आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
#WATCH | Panvel, Maharashtra | Actor Salman Khan cuts a cake as he celebrates his 60th birthday today. pic.twitter.com/8k3MqjpPWF
— ANI (@ANI) December 26, 2025
या ग्रँड पार्टीला क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा यांच्यासह या सोहळ्यात सहभागी झाला होता. चित्रपटसृष्टीतील तब्बू, करिश्मा कपूर, आदित्य रॉय कपूर, रितेश-जेनेलिया देशमुख, रकुल प्रीत सिंग आणि हुमा कुरेशी यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावून भाईजानच्या वाढदिवसाची शोभा वाढवली.
सलमान आपल्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाहत्यांना एक मोठी भेट देण्याची शक्यता आहे. सलमान त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईत देखील या वाढदिवसाची धूम पाहायला मिळाली.