​सलमान ह्रतिक रोशनवर या अभिनेत्रीमुळे नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 12:29 IST2016-07-13T06:59:30+5:302016-07-13T12:29:30+5:30

बॉलिवूड मध्ये कधी काय होईल याचे काहीच सांगता येत नाही. आज एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फिरणारे उद्या एकमेकांविषयी नाराज ...

Salman Hrithik Roshan is angry with the actress | ​सलमान ह्रतिक रोशनवर या अभिनेत्रीमुळे नाराज

​सलमान ह्रतिक रोशनवर या अभिनेत्रीमुळे नाराज

लिवूड मध्ये कधी काय होईल याचे काहीच सांगता येत नाही. आज एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फिरणारे उद्या एकमेकांविषयी नाराज होताना दिसतात. नुकतेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि ह्रतिक रोशन यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा असून तेही एका अभिनेत्रीवरून सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
आयफा २०१६ पुरस्कार सोहळ्यात सलमान आणि ह्रतिकमध्ये सलमानची जवळची अभिनेत्री डेझी शाह हिच्यावरून वाद झाला होता. त्यामुळे सलमान ह्रतिकवर नाराज असल्याचे समजते. 
आयफा सोहळ्यात सलमानने हृतिकला डेझीसोबत परफॉर्म करण्यास सांगितलं होतं. पण हृतिकने यासाठी साफ नकार दिला. इतकंच नाही तर डेझीसोबत स्टेज शेअर करणार नाही, असं हृतिकने आयफा आयोजकांनाही सांगितलं.
याआधी सलमान आणि हृतिक यांच्यात कटुता आल्याचं वृत्त होतं. हृतिक रोशनच्या ‘गुजारिश’वर थेट वार करत सलमान म्हणाला होता की, ‘कुत्राही या सिनेमा पाहण्यासाठी जाणार नाही.’ सलमानच्या या विधानावर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Web Title: Salman Hrithik Roshan is angry with the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.