"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 13:16 IST2025-05-23T13:15:33+5:302025-05-23T13:16:22+5:30
सलमानने आमंत्रण दिल्याने मी आले, असा भाईजानच्या घरी घुसखोरी केलेल्या मॉडेलने दावा केलाय. काय म्हणाली? जाणून घ्या

"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या (salman khan) घरात दोन जणांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांना चकवा देत या दोन जणांनी सलमानच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं. दरम्यान सलमानच्या घरी घुसखोरी करणारी मॉडेल ईशा छाब्रियाने मोठा दावा केलाय. ३६ वर्षीय ईशाने "सलमाननेच मला बोलावलं होतं", असा खुलासा केलाय. यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाली ईशा?
ईशा छाब्रियाचा मोठा खुलासा
२१ मे २०२५ रोजी, पहाटे ३ वाजता ३६ वर्षीय मॉडेल ईशा छाब्रियाने सलमान खानच्या निवासस्थानी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ईशाने दावा केलाय की, "सलमाननेच मला घरी यायला सांगितलं होतं. मी सलमानला सहा महिन्यांपूर्वी एका पार्टीत भेटले होते." ईशाने असेही सांगितले की, "सलमानच्या कुटुंबातील एका सदस्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला होता." मात्र खान कुटुंबाने या दाव्यांचे खंडन केले आहे. "सलमानने कोणालाच बोलावलं नव्हतं", असं त्यांनी सांगितलं.
पुढे बिल्डिंगच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि ईशा छाब्रियाला ताब्यात घेण्यात आले. ईशा विरुद्ध बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईशाशिवाय २० मे २०२५ रोजी, छत्तीसगडमधील २३ वर्षीय जितेंद्र कुमार सिंहने सलमान खानच्या निवासस्थानी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. "मी सलमानचा खानचा चाहता आहे आणि त्याला भेटण्यासाठी आलो आहे.", असा दावा त्याने केला होता. परंतु सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. अशाप्रकारे भाईजानच्या घरी घुसखोरी करणारे ईशा आणि जितेंद्र सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.