‘ओके जानू’ ट्रेलरवर सलमान फिदा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 15:11 IST2016-12-14T15:11:00+5:302016-12-14T15:11:00+5:30
तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ओके कन्मनी’ चा हिंदी रिमेक ‘ओके जानू’चा ट्रेलर लाँच झाला आणि यूट्यूबवर ट्रेलरला प्रचंड लाईक्स मिळाले. ...

‘ओके जानू’ ट्रेलरवर सलमान फिदा ?
त िळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ओके कन्मनी’ चा हिंदी रिमेक ‘ओके जानू’चा ट्रेलर लाँच झाला आणि यूट्यूबवर ट्रेलरला प्रचंड लाईक्स मिळाले. ‘बी टाऊन’च्या अनेक सेलिब्रिटींनीही ट्रेलरला पसंती दर्शवली. मात्र, अजून एका कलाकाराला हा ट्रेलर खूप आवडलेला दिसतोय...कोण आहे तो कलाकार ठाऊक आहे ? तो कलाकार म्हणजे सलमान. आपला सल्लूमियाँ नव्हे तर सलमान दलक्वेअर. ‘ओके कन्मनी’ या तमिळ चित्रपटाचा मुख्य अभिनेता सलमान दलक्वेअर हा ‘ओके जानू’ चित्रपटाच्या ट्रेलरवर फिदा झालाय.
![]()
२०१५ मध्ये ‘ओके कन्मनी’ हा तमिळ चित्रपट सलमान दलक्वेअर आणि नित्या मेनन यांच्या मुख्य भूमिकेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक बॉलिवूडच्या दिग्दर्शकांना एवढे आवडले की, त्यांनीही हिंदीमधून या चित्रपटाचा रिमेक काढायचे ठरवले. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे प्रेक्षकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करतील? अशी चर्चा सुरू झाली. मात्र, ट्रेलर पाहिल्यावर आदित्य-श्रद्धा यांच्यातील केमिस्ट्री सर्वांनाच भावली. ‘ओके जानू’ च्या निमित्ताने ‘आशिकी २’ ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याने दोघांचेही चाहते खुश आहेत.
![]()
सलमान दलक्वेअर याने ‘ओके जानू’चा ट्रेलर टिवट करून ‘धीस इज सच अ वंडरफुल टेक आॅन ओके कन्मनी! लॉटस आॅफ लव्ह टू करण, शाद, आदित्य, श्रद्धा आणि द व्होल टीम.’ असे म्हटले आहे. सलमानच्या ट्विटवर करण जोहरने उत्तर दिले की, ‘थँक्स अ टोन दलक्वेअर!! यू हॅव सेट द बार सो हाय...आय होप वी लाईव्ह अप!! लॉट्स आॅफ लव्ह...’