"ते माझ्या वडिलांसारखे, त्यांच्या घरी राहत होते तेव्हा...", सलीम खान रुग्णालयात असल्याचं कळताच सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:00 IST2026-02-18T10:59:51+5:302026-02-18T11:00:45+5:30
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमा अली खान हिनेदेखील भावुक पोस्ट शेअर करत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

"ते माझ्या वडिलांसारखे, त्यांच्या घरी राहत होते तेव्हा...", सलीम खान रुग्णालयात असल्याचं कळताच सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची पोस्ट
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी(१७ फेब्रुवारी) सलीम खान यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सलीम खान यांच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमा अली खान हिनेदेखील भावुक पोस्ट शेअर करत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.
सोमी अलीने सलीम खान यांचा फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. पोस्टमध्ये ती म्हणते, "सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय हे ऐकून माझं मन खिन्न झालं आहे. जगासाठी ते दिग्गज लेखक आहेत. ज्यांनी अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारच्या जडणघडणीसाठी मदत केली आणि शोलेसारखा मास्टरपीस सह-लेखनातून बनवला. पण माझ्यासाठी ते वडिलांच्या जागी आहेत. जेव्हा मी त्यांच्या घरात राहत होते. तेव्हा त्यांनी मला मुलीसारखी वागणूक दिली. त्यांच्यासोबत जेवणाच्या टेबलावर स्थान दिलं, श्रद्धा आणि धर्म यावर सखोल चर्चा केल्या, जिथे सर्व धर्मांचा सन्मान आणि उत्सव साजरा केला जात होता. त्यांनी मला शिकवलं की देव हा कोणत्याही एका मत प्रणालीपेक्षा मोठा असतो, आणि कथाकथनात नाट्याच्या पलीकडे नेहमीच सत्य दडलेलं असतं. त्यांच्या बुद्धिमत्तेने चित्रपटसृष्टीचा इतिहास घडवला. त्यांच्या माणुसकीने माणसं घडवली. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करेन. त्यांच्याबद्दलच्या भावना शब्दांत मांडू शकत नाही".
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान यांना सकाळी चक्कर आणि अस्वस्थता जाणवू लागली. तपासणी दरम्यान उच्च रक्तदाब झाल्याने (High Blood Pressure) त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ (Blood Clot) झाल्याचे निदान झाले आहे. सुरुवातीला त्यांना आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले होते, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. रक्ताची ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.